नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

https://holarsamajssp.blogspot.com/ https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/ विषय: होलार समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष – तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने 2013 पासून विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करूनही आजतागायत समाजाच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. अनेक वेळा निवेदने, चर्चासत्रे व मागण्यांचे सादरीकरण करूनही आजपर्यंत ठोस निर्णय किंवा कार्यवाही करण्यात आलेली नाही. हा समाज शिक्षण, नोकरी, सामाजिक सुरक्षा, आरक्षण, वसतीगृहे, आर्थिक विकास यांसारख्या मूलभूत हक्कांपासून वंचित आहे. शासनाकडून या मागण्यांची दखल घेऊन तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा, ही आमची नम्र पण ठाम मागणी आहे. जर शासनाने लवकरात लवकर या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर होलार समाज संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन, अन्नत्याग, उपोषण आणि इतर संविधानिक मार्गांनी निषेध नोंदविणार आहे. या आंदोलनाची जबाबदारी संपूर्णपणे राज्य सरकारवर राहील. महत्त्वाची सूचना: दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी नवी पेठ, पुणे येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये पुढील आंदोलनाची दिशा, योजना व पुढील कृती निश्चित केली जाणार आहे. राज्य सरकारने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन समाजाला न्याय द्यावा, ही नम्र विनंती आहे. अन्यथा उद्रेक अनिवार्य ठरेल. आपला विश्वासू, श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts