होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था संस्थापक अध्यक्ष: मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक: 28 ऑक्टोबर 2025 स्थळ: नवी पेठ, पुणे - पत्रकार परिषद प्रेस नोट / पत्रकार परिषद निवेदन होलार समाजाच्या विविध मागण्याकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष मागील 70 वर्षांपासून वंचित व अन्यायग्रस्त स्थितीबाबत. अनुसूचित जातीमध्ये असूनही होलार समाजाला आजतागायत त्याचे घटनात्मक, सामाजिक व आर्थिक हक्क मिळालेले नाहीत. याबाबत सरकारने अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत, ही अत्यंत दुःखद व संतापजनक बाब आहे. आम्ही, होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, 28 ऑक्टोबर 2025 रोजी पुण्यातील नवी पेठ येथे पत्रकार परिषद घेऊन, आपली मागणी सार्वजनिकपणे मांडत आहोत. तथा होलार समाज सामाजिक संस्था IS0 9001: 2015 आंतरराष्ट्रीय प्रामाणित संस्था या मानांकन प्राप्तीचा गौरव सोहळा. होलार समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा. समाजाच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक योगदानाची योग्य नोंद व सन्मान करण्यात यावा. आमची विनंती आहे मा.ना. श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांनी या बाबीकडे स्वतः लक्ष घालावे व समाजाच्या न्याय्य मागण्या त्वरित मान्य कराव्यात. अन्यथा: जर आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले, तर होलार समाज रस्त्यावर उतरेल. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन आणि अन्नत्याग उपोषण सुरू करू. या आंदोलनाची सुरुवात पुण्यातून केली जाईल आणि पुढील तारीख पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली जाणार आहे सरकारने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, ही नम्र विनंती आहे. अन्यथा उद्रेक अनिवार्य आहे. सर्व समाज बांधवांना एकत्र करून न्याय सन्मान व हक्कासाठी आवाज उठवणार आहोत. आपली उपस्थिती आम्हाला नवी ऊर्जा देईल आणि समाजासाठी एक सकारात्मक संदेश जाईल. असे आव्हान श्री. बबनराव करडे मा.नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार. अँड. जी .एन .ऐवळे कायदे तज्ञ तथा संस्थेचे सल्लागार. श्री. अर्जुन खांडेकर सचिव. श्री. जगन्नाथ पारसे खजिनदार यांनी केले आहे याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी.
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-