https://holarsamajssp.blogspot.com/ https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com विशेष आमंत्रण होलार समाज सामाजिक संस्था, पुणे (ISO 9001:2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करणारी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील वंचित होलार समाजातील पहिली संस्था) चलो चलो छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यशाळा दिनांक: 10 जुलै 2025 वेळ: सकाळी 10:00 ते सायंकाळी 5:00 स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर सन्माननीय समाजबांधवांनो, होलार समाज सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, समाजाच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. या कार्यशाळेमध्ये संभाजीनगर, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील प्रतिनिधी सदस्य, महिला, विद्यार्थी, पालक, कार्यकर्ते व होलार समाजाच्या इतर संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. समाजाला भेडसावणाऱ्या अडचणींवर चर्चा करून त्यावर उपाययोजना ठरवण्यासाठी आणि एकत्र येऊन सामाजिक एकजुटीचा संदेश देण्यासाठी ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण सर्वांनी वेळेत उपस्थित राहून समाजकार्यात सक्रीय सहभाग घ्यावा, ही विनम्र विनंती. आपला विश्वास, होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे संपर्क: 9764969074 अधिक माहितीसाठी संस्थेची स्वतंत्र वेबसाईट होलार समाज सामाजिक संस्था या वेबसाईटला भेट द्यावी
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-