नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे नोंदणीकृत संस्था | ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्थापक अध्यक्ष: आदरणीय श्री. नामदेवराव आयवळे संस्थेचे शिष्टमंडळ सातत्याने सरकार दरबारी समाजाच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करत आहे. महत्वाची माहिती – होलार समाजातील बांधवांसाठी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील घटक होलार समाज आजही सामाजिक व शैक्षणिक विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. याचे मुख्य कारण म्हणजे – जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असलेला ५० वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक पुरावा अनेकांना उपलब्ध नाही. कारण: आमचे पूर्वज शाळेत शिकलेले नव्हते. शेतीचा व्यवहार नव्हता. ग्रामपंचायतीमध्ये जुनी नोंद नाही. त्यामुळे आजोबा–पंजोबांशी संबंधित कोणतीही अधिकृत कागदपत्रे उपलब्ध नाहीत. यामुळे अनेक समाज बांधवांना अनुसूचित जाति प्रवर्गात असूनही शासकीय योजना, शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती, नोकरीतील आरक्षण अशा कोणत्याही लाभाचा उपयोग करता येत नाही. समाजासाठी आवाहन ज्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र अथवा जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही आणि जे उच्च शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रियेसाठी अडचणीत आहेत, अशा सर्व होलार समाज बांधवांनी कृपया होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याशी त्वरित संपर्क साधावा. संस्था प्रामाणिकपणे व योग्य मार्गदर्शन करून आपल्या अडचणी सोडविण्यास मदत करेल. आपली संस्था –आपल्या हक्कासाठी आपल्या समाजाचा विकास हा आपल्याच एकतेतून साध्य होऊ शकतो. त्यामुळे सर्व बांधवांनी या आवाहनाची गंभीर दखल घ्यावी. संपर्क:7972140451 होलार समाज सामाजिक संस्था समाजहिताय, समाजविकासाय ISO 9001:2015 प्रमाणित


 

Featured Post

ऐतिहासिक विभागीय कार्यशाळा उपस्थित राउपण्याबाबत संस्थेच्या वतीने आव्हान मा.बबन करडे नायब तहसीलदार संस्थेचे सल्लागार

 होलार समाजाच्या विभागीय कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे महाराष्ट्रव्यापी आवाहन✓ # 🚩 होलार समाजाच्या प्रश्नांसाठी निर्णायक संवादाची संधी! 🚩  ...

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts