नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे IS0 9001:2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचे आंतरराष्ट्रीय मानकर प्रात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांचा छत्रपती संभाजीनगर येथे सत्कार छत्रपती संभाजीनगर | दि. 8 जुलै 2025 — होलार समाज सामाजिक संस्था, पुणे यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित एक दिवशीय कार्यशाळा निमित्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी मराठवाडा विभागातील (हिंगोली, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर) होलार समाज बांधवांची भेट घेऊन कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले. या दौऱ्यात नामदेवराव आयवळे यांचा छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. प्रा. संतोष गडदे (होलार समाज चळवळीचे अभ्यासक) यांच्या हस्ते त्यांना पुष्पहार अर्पण करून गौरवण्यात आले. सदर प्रसंगी कृष्णा ऐवळे/ निवृत्त उप अभियंता म्हाडाऔरंगाबाद , अँड. होनमाने, श्री सुधाकर केजगीर, शैलेश जाधव, नवनाथ केजगीर, नवनाथ गडदे, सचिन केजगीर, सुरज केजगीर हे समाज बांधव उपस्थित होते. संस्थेच्या या उपक्रमातून होलार समाजातील बांधवांमध्ये एकता, जागरूकता आणि सामाजिक उन्नतीचा प्रेरणादायी संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

Featured Post

 *अमरावती विभागातील होलार समाजबांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल!* *https://viralnewsmaharashtra1.blogspot.com/2026/09/blog-post_21.html* *संप...

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts