नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

होलार समाज सामाजिक संस्था, (महाराष्ट्र राज्य) संस्थेच्या वतीने जाहीर आवाहन होलार समाजाचा सामाजिक आर्थिक व सर्वागीण विकास व्हावा, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, जातीचे दाखले, पडताळणी प्रमाणपत्रे काढताना येणाऱ्या विविध अडचणी बाबत सखोल मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापूर येथे नियोजित बैठक महाराष्ट्र शासन अध्यक्ष/सदस्य/सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कोल्हापूर यांच्या आदेशाने नियोजित बैठक .डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दुसरा मजला विचारे मळा कोल्हापूर या ठिकाणी दि. 20 मार्च 2025 रोजी वेळ दुपारी 1 वाजता आयोजित केली आहे. होलार समाज सामाजिक संस्था, पुणे यांच्या शिष्टमंडळ श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात व अथक प्रयत्नाने. कोल्हापूर जिल्ह्यातील होलार समाज बांधवांना कळविण्यात येते की, महाराष्ट्रातील होलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या झालेल्या नोंदीमुळे होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता येत असलेल्या अडचणीमुळे होलार समाजाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही होलार समाजाच्या जात प्रमाणपत्राबाबत अडचणीचे निरसन करून होलार समाजाला वेळेत व सुलभ रीतीने जात प्रमाणपत्र दिले जावे या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर येथे संत रोहिदास चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळ कोल्हापूर श्री. एन एम पवार साहेब विभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तिसरा मजला विचारे मळा कोल्हापूर येथे दुपारी 3 वाजत बैठक नियोजित आहे. तसेच होलार समाज सामाजिक संस्थेने मागील सहा वर्षात या संस्थेने भरीव कार्य केले असून आज होलार समाजाला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची क्षमता या संस्थेमध्ये निर्माण झालेली आहे ते वापरून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील होलार समाज बांधव, प्रतिनिधी, महिला, विद्यार्थी, पालक, कार्यकर्ते, यांना आमंत्रित करण्यात येत आहे. सदर बैठकीचा सर्वांना लाभ होईल.

Featured Post

*दिनांक: 14-04-2026** ## प्रमाण-विचार : सविस्तर विवेचन **“कुठल्याही व्यक्ती वा संस्था वा संघटनेने आपल्या बाह्य हितसंबंधांच्या गरजा व अपेक्षांची यथाशक्ती पूर्तता करावी”** हा विचार मूलत: संतुलन, जबाबदारी आणि नैतिकता यावर आधारित आहे. --- ### 🔹 संस्थेची ओळख **होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य** *(ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था)* **संस्थापक अध्यक्ष:** मा. श्री. नामदेव आयवळे --- ### 🔸 1. संकल्पनेचा अर्थ * प्रमाण-विचार म्हणजे कोणतीही कृती करताना अतिरेक किंवा दुर्लक्ष टाळून योग्य प्रमाणात निर्णय घेणे. * बाह्य हितसंबंधांमध्ये ग्राहक, पुरवठादार, समाज, सरकार आणि पर्यावरण यांचा समावेश होतो. 👉 याचा अर्थ असा की, संस्था फक्त स्वतःच्या फायद्यावर लक्ष केंद्रित न करता इतर संबंधित घटकांचाही विचार करते. --- ### 🔸 2. मुख्य तत्त्वे ✔️ संतुलन – स्वतःचे व इतरांचे हित यामध्ये समतोल राखणे ✔️ न्याय्यता – सर्व घटकांना समान न्याय देणे ✔️ जबाबदारी – सामाजिक व नैतिक कर्तव्यांची जाणीव ठेवणे ✔️ यथाशक्ती पूर्तता – उपलब्ध संसाधनांनुसार अपेक्षा पूर्ण करणे --- ### 🔸 3. उपयोग * उद्योग व व्यवसाय क्षेत्रात * शैक्षणिक संस्थांमध्ये * शासन व्यवस्थेत * वैयक्तिक जीवनात --- ### 🔸 4. उदाहरण एखादी कंपनी नवीन प्रकल्प उभारते तेव्हा नफा, समाजहित आणि पर्यावरण यामध्ये संतुलन राखणे आवश्यक असते. --- ### 🔸 5. निष्कर्ष प्रमाण-विचार ही एक संतुलित व नैतिक विचारसरणी असून, ती संस्थेच्या दीर्घकालीन यशासाठी अत्यंत उपयुक्त आहे. --- **– होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य –**

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts