जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला भगिनींना शुभेच्छा व होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे. संस्थेचा 6 व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा 🙏 संस्थेचे सर्व अधिकारी, प्रतिनिधी, सभासद महाराष्ट्रातील समाजबांधव महिला, विद्यार्थी, कार्यकर्ते समाजाच्या इतर संघटनाचे प्रतिनिधी व सदस्य यांना संस्थेच्या 6 व्या वर्धापन दिनानिमित्त व जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला भगिनींना शुभेच्छा तसेच आजच्या स्रिला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झालेली आहे. तिला समाजात नावलौकिक तिच्या कर्तुत्वाने मिळत आहे. सर्व क्षेत्रात ती पुरूषांपेक्षा कुठे ही कमी नाही. जुन्या भोळसट कल्पनांना झुगारून ती आज स्वाभिमानाने आणि स्वबळावर जगत आहे. आजच्या या स्रिला समाजाची काही बंधने आणि जबाबदारी यात पुरती अडकलेली असते. त्यात संसार हा जणू तिची अग्निपरीक्षाच आहे. असं म्हटल तर वावग ठरणार नाही. कधी सून ,कधी वहिणी,कधी जावा,आत्या हे सारे नात्यांचे बंध व संस्काराची जपवणूक ती विना तक्रार करीत असते....त्यातून शालिनतेचे मोठे शिवधनुष्यच पेलायचे असते...तिचं बिनधास्त वागणं घर व समाज कधीही खपवून घेत नाही....नावे ठेवली जातात.शिवाय तिला वेळेचीच नाही तर अनेक गोष्टींच्या मर्यादांनी ती जखडलेली असूनही ती सारे सहज लिलया सांभाळून घेणे. त्यागाची,सहनशिलतेची मोठी देणगीच जणू ईश्वराने तिला बहाल केली आहे.... सासरी सर्व सणवार ,रितीभाती,नाती यांना सांभाळून आज ती उजळ माथ्याने एक यशस्वी सुशिक्षित स्री म्हणून ओळखली जाते.सर्वच क्षेत्रात आज ती पाय रोवून खंबीर उभी आहे.हिरकणी ह्या मानाने तिच्याकडे पाहिले जाते.घर व पैसा यांचा चांगला मेळ ती बसवते.आणि म्हणूनच काही अंशी स्री मर्यादाच्या बंधनांनी जरी जखडली असली तरीआता ती त्यातून बाहेर पडली आहे.स्वतःची जबाबदारी पेलून अख्खं घर ती मोठ्या शिताफिने सांभाळत आहे ..मग ती संसाराचीच काय सन्मानाची खरोखर रणरागिणी आहे ना?..स्री ही विधात्याची अलौकिक देण आहे. संसाराच्या रथाची शान आहे. नवनिर्मितीची खाण आहे... तिच्या कल्पना शक्तीला व त्यागाला लाख लाख सलाम..... असता बंधनाच्या बेड्या घातल्या त्यास कर्तव्याच्या पायघड्या!!!! आज सर्व क्षेत्रात ती अग्रेसर आहे. कारण ती जागृत झाली आहे. शिवाय पुरुषाच्या बरोबरीने अर्थिक जबाबदारी पेलून आपला ठसा उमटवित आहे. स्री ही संसाराची मांगल्याची तुळस तर आहेच, पण संसाराचे सुख व आनंद तिच्याच ठायी आहे हे त्रिकाल सत्य आहे.. होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे. तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री. नामदेवराव आयवळे पुणे. मो.7972140451
Popular Posts
-
-
होलार समाजासाठी विभागीय कार्यशाळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाली – छत्रपती संभाजीनगरात बार्टी व होलार समाज संस्थेचा उपक्रम छत्रपती संभाजीनगर, 10 जुलै 2025 – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती वस्ती सुधार योजना (बार्टी), पुणे व होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय विभागीय कार्यशाळेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले. ISO 9001:2015 प्रमाणित संस्थांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेचा मुख्य उद्देश जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र संदर्भातील अडचणी, बेरोजगारी, उद्योग धोरणे व युवा गट स्थापनेविषयी समाजाला योग्य मार्गदर्शन समाज कल्याण विभागाच्या विविध योजना होलार समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी सरकार, समाज, आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून समन्वय साधून विविध योजनेची अंमलबजावणी करणे हा कार्यशाळेचा उद्देश सामाजिक करणे हा होता. कार्यशाळेची सुरुवात थोर महापुरुषांच्या प्रतिमाचे मान्यवराच्या हस्ते पूजन करण्यात आले प्रमुख या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून बार्टी, पुणेचे अप्पर जिल्हाधिकारी व प्रशिक्षण विभाग प्रमुख, प्रकल्प व्यवस्थापक श्री. नितीन सहारे, सचिन नांदेडकर, संबंधित जिल्ह्यांचे उपविभागीय अधिकारी, कन्नड येथील प्रांत तहसीलदार, महसूल विभागाचे अधिकारी, जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य, समाजकल्याण विभागाचे अधिकारी, तसेच बार्टी संस्थेतील विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बार्टीचे श्री. नितीनजी सहारे सर यांनी सादर केले. त्यांनी प्रकल्पाच्या उद्देशांबाबत सविस्तर माहिती दिली. बार्टीच्या विविध योजना समजावून सांगितल्या उपविभागीय अधिकारी व तहसीलदार महसूल विभाग यांनी जात प्रमाणपत्र प्रक्रिया व येणाऱ्या अडचणींचे सखोल विश्लेषण केले. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेबाबत जिल्हा जात पडताळणी समिती, छत्रपती संभाजीनगर यांनी मार्गदर्शन केले. होलार समाजाचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे यांनी समाजाच्या प्रमुख अडचणी अधिकार्यांच्या समोर प्रभावीपणे मांडल्या. व होलार समाजाच्या विकासासाठी बार्टी पुणे मार्फत विशेषतः विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेतल्या जात इतिहास घडत आहे मा. सुनील वारे महासंचालक यांना व सर्व टीमचे समाज बांधवांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. अनेक समाजबांधवांनी देखील आपले प्रश्न प्रत्यक्षपणे मांडले. या संवादातून अनेक शंका दूर झाल्या व उपाययोजना सुचविण्यात आल्या. कार्यक्रमाचा समारोप व आभारप्रदर्शन श्री. नितीनजी सारे यांनी केले. या कार्यशाळेमुळे होलार समाजातील नागरिकांना प्रशासनाशी थेट संवाद साधता आला तसेच जात पडताळणी आणि रोजगाराच्या संधींबाबत मोलाचे मार्गदर्शन मिळाले सर्व कार्यक्रमाला उपस्थित समाज बांधव पदाधिकारी यांना संस्थेच्या वतीने धन्यवाद
-