श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष. होलार समाज सामाजिक संस्था, पुणे संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील होलार समाज बांधवांना कळविण्यात येते की, जात प्रमाणपत्र मिळवण्याबाबतचा तसेच पन्नास वर्षांपूर्वीची नोंद मिळण्याकरिता महसूल कार्यालयामध्ये होलार समाजाला अडचणीचा सामना करावा लागत होता परंतु यापुढे अडचणीचा सामना करावा लागणार नाही. याबाबत. आत्ता त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, जात प्रमाणपत्र पडताळणी नियमांमध्ये नियम क्रमांक ४(३) मध्ये खालील प्रमाणे नमूद केलेले आहे. ▪️ अर्जदार, वरील पोट-नियम (२)चे नमूद केलेल्या कोणताही दस्तऐवज सादर करण्यास असमर्थ असेल तर अशा बाबतीत, अर्जदार आपल्या शपथपत्रांमध्ये त्या विषयाचे कारण नमूद करील आणि सक्षम प्राधिकारी निर्णय घेईल. ▪️होलार समाजाला अथवा समाजातील जो वंचित घटक असेल त्यांना जात प्रमाणपत्र देताना काही कागदपत्राचा अभाव असल्यास गृह चौकशी करून त्यांचा अहवाल व उपलब्ध कागदपत्रे याचा विचार करून जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाहीला सुरुवात होत आहे . जेणेकरून होलार समाजाला शासकीय योजनेचा लाभ घेता येईल. काही अडचणी आल्यात होलार समाज सामाजिक संस्था, पुणे या संस्थेकडे संपर्क साधावा मोबाईल नंबर ७९७२१४०४५१- ९७६४९६९०७४
Featured Post
