https://holarsamajssp.blogspot.com/ https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/ महाराष्ट्रातील होलार समाज बांधवांना नम्र विनंती करण्यात येते की आपली जात चुकून मांग चांभार धनगर अशी लागली आहे परंतु परत होलार समाजामध्ये येण्याची आपली इच्छा असेल तर आपणास होलार समाजाचे जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र पडताळणी मिळेल परंतु आपण महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यात जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीची संपूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. अर्जदारांना अर्ज डाऊनलोड करणे, अर्ज ट्रॅक करणे, त्रुटीची ऑनलाइन पूर्तता करणे, अर्जदारास डिजिटल स्वाक्षरीचे वैधता प्रमाणपत्र ई-मेलद्वारे उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. अर्जदारांना येणारी अडचणी/मार्गदर्शन यासाठी हेल्प डेक्स सुविधा सुरू केली आहे. सर्व समित्यामार्फत गुणवत्तेवर निर्णय घेऊन जास्तीत- जास्त जात वैधता प्रमाणपत्रे निर्गमित करण्याबाबतची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच सर्व जिल्ह्यांमध्ये महसूल विभाग व शिक्षण विभागाच्या सहकार्याने शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचे वाटप करण्याबाबतची मोहीम सुरू आहे अर्जदारास डिजिटल स्वाक्षरीतील वैधता प्रमाणपत्र ई-मेल द्वारे प्राप्त होण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे काही कागदपत्राच्या त्रुटी असतील तर आमच्याकडे ते नाहीये अर्जामध्ये नमूद करावे.तसेच अजून काही अडचणी आल्यास होलार समाज सामाजिक संस्थेसी संपर्क साधावा संस्था आपणास योग्य माहिती व मार्गदर्शन करेल.
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-