नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

होलार समाज सामाजिक संस्था (महाराष्ट्र राज्य), संस्थेच्या वतीने प्रामाणिक कार्यपद्धती व उद्देश ,(कालावधी 1.1.2025 ते 31.12. 2025 ) मोफत मोफत खालील प्रमाणे श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात. "होलार समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जात प्रमाणपत्र महत्वाचे. अनुसूचित जातीतील होलार समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र रेषेखालील जीवन जगणाऱ्या व्यक्तींना त्यांचे जीवनमान उच्छाविणे, समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी होलार समाज सामाजिक संस्थेमार्फत विविध योजनांची माहिती व मार्गदर्शक. 1 . महाराष्ट्रातून होलार समाजाच्या विकासासाठी बार्टी, पुणे मार्फत विशेषता विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे विभागीय कार्यशाळा घेण्यास हो.स. सा. संस्थेला यश. 2 . दत्तक योजना मोफत केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत समाजातील होनहार/ हुशार मुलांच्या सहभाग व्हावा यासाठी आपणही समाजाचे काही देणे लागतो" या तत्वावर"होलार समाज सामाजिक संस्था"फक्त होलार समाजातील आर्थिकदृष्ट्या गरीब, गरजू, हुशार काही मुलांना ज्याची पदवी पूर्ण आहे अशा मुलांची चाळणी परीक्षा घेऊन पुण्यात काही महिन्यापर्यंत राहण्या खाण्याची मोफत सोय करण्याचे नियोजन आहे. 3 . मुला मुलींना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, आधिछत्रवृत्ती माहिती व मार्गदर्शन. तज्ञांकडून केले जाते. 4 . गरजू विद्यार्थ्यांसाठी आठवी ते बारावी पर्यंतचे मराठी आणि इंग्लिश मिडीयमचे क्लास पुणे येथे मोफत. 5 . महिला बचत गट उद्योगासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक, सामूहिक व सामायिक लाभाच्या योजना याविषयी मार्गदर्शन. 6 . महाराष्ट्रातून होलार समाजाला जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणीवर चर्चा व मार्गदर्शन. 7 . आम्ही आम्हाला लागू असलेल्या सर्व कायद्याचे पालन करतो. 8 आम्हीआय.एस.ओ.9001-2015 आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत हे प्रमाणपत्र 2025 ला मिळवणार 9 . होलार समाजातील भूमिहीन शेतमजूर अत्याचार पीडित यांना समाज कल्याण विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन.

Featured Post

# 🌹 हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा 🌹 **होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे** **(ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था)** संस्थेचे **संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे** व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी **डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे** येथे सदिच्छा भेट देऊन समाजहिताच्या विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीमध्ये **होलार समाजातील युवक-युवतींना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, शासकीय सेवांमध्ये अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे, तसेच बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे** या विषयांवर अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. तसेच, **होलार समाजातील अनेक विद्यार्थी व नागरिकांना भेडसावणाऱ्या जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्रासंदर्भातील अडचणी, आवश्यक कागदपत्रे, पडताळणी प्रक्रिया, कायदेशीर बाबी आणि शासनाच्या नियमांनुसार योग्य मार्गदर्शन** या विषयावरही सखोल चर्चा करण्यात आली. या संदर्भात **मा. श्री. नितीन सारे सर** यांनी अतिशय महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि मार्गदर्शक सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळे समाजातील विद्यार्थी, पालक व नागरिकांच्या अनेक शंकांचे निरसन होण्यास निश्चितच मोठी मदत होणार आहे. यावेळी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाच्या संदर्भातही त्यांनी अत्यंत प्रेरणादायी व मोलाचे मार्गदर्शन करून युवक-युवतींना शासकीय सेवेकडे वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहित केले. **मा. श्री. नितीन सारे सर** यांचे समाजहिताची जाणीव ठेवून दिलेले बहुमोल मार्गदर्शन आणि सहकार्याबद्दल **होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे** यांच्या वतीने मनःपूर्वक **हार्दिक अभिनंदन**, **मनःपूर्वक आभार** आणि उज्ज्वल भविष्यासाठी **हार्दिक शुभेच्छा**! आपले सहकार्य आणि मार्गदर्शन भविष्यातही समाजाच्या प्रगतीसाठी असेच लाभत राहो, हीच सदिच्छा. **💐 हार्दिक अभिनंदन! हार्दिक शुभेच्छा! 💐** श्री.जगन्नाथ पारसे खजिनदार **– होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे** *(ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था)* **संस्थापक अध्यक्ष : आदरणीय श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे**

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts