नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने दि.19.2.2025 पासून प्रत्येक रविवारी दुपारी तीन ते चार या वेळेत संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबेवाडी पुणे येथे लाईफ कोच/जीवन-मार्गदर्शक विद्यार्थी, समाज बांधवांला त्याचे ध्येय साध्य करण्यासाठी उपक्रम सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार ते ध्येय जीवनक्रम, नातेसंबंध, स्वतःची काळजी आणि इतर बऱ्याच बाबतीतले असू शकते . लाइफ कोच / जीवन-मार्गदर्शक समाज बांधवांला त्यांचे जीवन सुधारण्यासाठी अनेक मार्गांनी मदत करू शकतो उदा. : 1 .उद्दिष्ट ठरवणे : समाज बाधवाला त्यांची उद्दिष्टे ओळखण्यास आणि ते साध्य करण्यासाठी योजना बनविण्यात मदत करणे 2 . वर्तन बदल : समाज बांधवांला त्यांचे वर्तन आणि दृष्टीकोन बदलण्यास मदत करणे 3 .वैयक्तिक प्रगती : समाज बांधवांला त्यांचा आत्मसन्मान आणि स्वत:चे मूल्य सुधारण्यास व वर्धन करण्यात / वाढवण्यात मदत करणे 4 .नातेसंबंध : समाज बांधवांला त्यांचे इतरांशी संबंध सुधारण्यात मदत करणे 5 . जीवनक्रम : समाज बांधवांला त्यांचा जीवनक्रम आणि नोकरीची कामगिरी सुधारण्यास मदत करणे 6 .आरोग्य : समाज बांधवांला त्यांचे शारीरिक आरोग्य, भावनिक / मानसिक कल्याण आणि आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत करणे ............. लाइफ कोच / जीवन-मार्गदर्शक समाज बांधवांला मदत करण्यासाठी विविध तंत्रांचा वापर करतात उदा. 1 . योग्य प्रश्न विचारणे 2 .समाज जे सांगतो त्याची कल्पना करणे / डोळ्यासमोर ते दृश्य पाहणे 3 .समाज बांधवांच्या मुद्यांची पुनर्मांडणी व.पुनर्बांधणी करणे 4 . समाजाच्या वर्तनाचे आकलन त्यानाच करायला लावणे. जीवन-मार्गदर्शन पद्धती : 1 . समोरच्या व्यक्तीला विविध गोष्टिं / जीवनपैलुंबाबत सध्या किती समाधानी आहे ते विचारणे 2 .त्या गोष्टी वा ते जीवनपैलू म्हणजे : आर्थिक, मानसिक, सामाजिक, कौटुंबिक, वागणूकसंबंधी, जीवनक्रमसंबंधी वगैरे 3 . त्यातून त्या माणसाचा पंचपदरी आकृतीबंध उलगडेल 4 .तो आकृतीबंध तसाच का आहे ते विचारणे 5 .त्या आकृतीबंधात संख्यात्मक व गुणात्मक सुधारणा कशी करता येईल ते विचारणे 6 .सुधारणेसंबंधी विविध रण(व्यूह)नीती शोधणे 7 .त्यावर विचारमंथन करून एक रण(व्यूह)नीती सुनिश्चित करणे 8 . त्या रण(व्यूह)नीतीस लागू करण्यासाठी समोरच्याला असलेले बल / दौर्बल्य याचा आढावा घेणे 9 .बलवृद्धीसाठी नियोजन करणे 10 . दौर्बल्यर्‍हासास्तव नियोजन करणे वगैरे वगैरे सर्व योग्य मार्गदर्शक संस्था प्रामाणिकपणे प्रयत्न करणारं आहे. याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी .

Featured Post

नमस्कार 🙏 महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेली **होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे (ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त)** ही संस्था अल्पावधीतच समाजाच्या विश्वासाचे केंद्र बनली आहे. संस्थेच्या अधिकृत वेबसाईटला एक *१, लाख ८0 हजारा पेक्षा अधिक भेटी** मिळाल्या असून, यावरून संस्थेच्या कार्याची पोहोच व विश्वासार्हता स्पष्ट होते. संस्था समाजाच्या गरजा ओळखून विविध उपक्रम राबवत आहे महाराष्ट्रातील सर्व विभागमध्ये कार्यशाळा पुणे विभागीय कार्यशाळा, नाशिक विभागीय कार्यशाळा, लातूर विभागीय कार्यशाळा ,छत्रपती संभाजी नगर विभागीय कार्यशाळा, नागपूर विभागीय कार्यशाळा, अमरावती विभागीय कार्यशाळा, कोकण विभागीय कार्यशाळा ,विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई व पुणे अशा संपूर्ण महाराष्ट्रात कार्य विस्तारत असून, समाजातील अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे. हे अत्यंत धाडसी, प्रामाणिक व समर्पित समाजसेवक असून, मर्यादित साधनसंपत्ती असतानाही स्वतःच्या कष्टातून व आर्थिक योगदानातून समाजसेवा करत आहेत. संस्थेमार्फत इतिहासात प्रथमच **होलार समाजासाठी स्वतंत्र विभागीय कार्यशाळा** आयोजित करण्यात आल्या. या कार्यशाळांमध्ये: • जात प्रमाणपत्र व जात वैधता पडताळणी प्रक्रियेचे मार्गदर्शन • समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती • स्वयं-सहाय्यता गट व युवक विकास मार्गदर्शन यासाठी संबंधित शासकीय विभागांना आमंत्रित करून मार्गदर्शन देण्यात आले. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, प्रतिनिधी व समाज बांधव सहभागी होऊन या कार्यशाळा यशस्वी ठरल्या. संस्थेचे प्रमुख उपक्रम: ✔ स्पर्धा परीक्षा अभियान ✔ महिला सशक्तीकरण अभियान ✔ जात पडताळणी व जात वैधता अभियान ✔ व्यसनमुक्ती अभियान ✔ युवक विकास अभियान ✔ सर्वधर्मसमभाव वधू-वर सूचक अधिकृत अभियान या सर्व उपक्रमांद्वारे समाजातील विविध समस्या सोडवून, समाजाच्या प्रगतीसाठी संस्था कटिबद्ध आहे. महाराष्ट्रभर फिरून प्रत्येक समाज बांधवाच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य अधिक व्यापक व प्रभावी होईल, याची खात्री आहे. धन्यवाद 🙏

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts