नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

श्री.नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून. होलार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने अनुसूचित जातीतील वंचित होलार समाजाच्या आर्थिकदृष्ट्या व दारिद्र रेषेखालील जीवन जगणाऱ्या व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचाविणे समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी संस्थेमार्फत विविध शासकीय योजनेची माहिती व मार्गदर्शन तळागाळापर्यंत पोहोचले जाते त्यामुळे महाराष्ट्रातील होलार समाज बांधवांना मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ होताना दिसत आहे. जसे की. महसूल विभागामार्फत जात प्रमाणपत्र मिळण्यासाठीची प्रक्रिया, आणि जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी प्रक्रिया, समाज कल्याण विभागाच्या विविध योजना, मार्गदर्शन. बार्टी, पुणे अंतर्गत कौशल्य विकास विषयावर मार्गदर्शन तसेच पात्र व इच्छुक उमेदवाराकरिता बँक(आयबीपीएस) रेल्वे, एलआयसी, नाबार्डे, एसबीआय, आरबीआय, आर आयरबी इ. तत्सम विभागातील पदाच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम. व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या न्यायिक सेवा( विधी) पदाच्या स्पर्धा परीक्षा व पोलीस/पदाच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य सेवा(राज्यप राजपत्रित ) स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम.( अनिवासी) संघ लोकसेवा आयोग मार्फत यूपीएससी घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दिल्ली (अनिवार) ऑनलाइन स्वरूपात अर्ज मागविण्यात येत आहे सदर योजनेचे सविस्तर तपशील शासनाच्या योजना संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित मार्फत करण्यात येण्यासारखे व्यवसाय- १ रिक्षा, २ चर्मोद्योग, ३ मिनीडोअर ४ रिक्षा -टेम्पो,४जिप,५ ट्रॅक्टर, ६ मिनी ट्रॅक्टर ७ कापड दुकान,८ किराणा दुकान,९ जनरल स्टोअर्स, १० सौंदर्य प्रसाधने, ११ ब्युटी पार्लर, १२ दवाखाना, १३ औषधाचे दुकान, १४ उपहारगृह, १५ टेलरिंग फार्म, १६ रेडीमेड गारमेंट, १७ हार्डवेअर, १८ वीट निर्मिती, १९ इलेक्ट्रिक दुकान, इतक्या दिवस याशिवाय इतर व्यवसाय ज्या व्यवसायापासून उत्पादन मिळेल अशा सर्व कायदेशीर व्यवसायासाठी लाभार्थी त्यांच्या पसंतीप्रमाणे कोणत्याही व्यवसायासाठी अर्ज करू शकतो. संस्था हे सर्व प्रामाणिकपणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री नामदेवराव आयवळे पुणे.

Featured Post

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts