नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे. वचन देत आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील वंचित होलार समाजाच्या आर्थिकदृष्ट्या व दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचावणे समाज प्रवाहात यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास सुविधांमध्ये सुधारणा घडवण्यासाठी सातत्याने शिक्षण व नाविन्याचा ध्यास घेणाऱ्या संस्कृतीचे संवर्धन करण्याचाही आमचा निश्चय आहे. श्री.नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून. विविध शासकीय योजनेची माहिती व मार्गदर्शन तळागाळापर्यंत पोहोचले जाते त्यामुळे महाराष्ट्रातील होलार समाज बांधवांना मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ होताना दिसत आहे. जसे की. महसूल विभागामार्फत जात प्रमाणपत्र मिळण्यासाठीची प्रक्रिया, आणि जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी प्रक्रिया, समाज कल्याण विभागाच्या विविध योजना, मार्गदर्शन. बार्टी, पुणे अंतर्गत कौशल्य विकास विषयावर मार्गदर्शन तसेच पात्र व इच्छुक उमेदवाराकरिता बँक(आयबीपीएस) रेल्वे, एलआयसी, नाबार्डे, एसबीआय, आरबीआय, आर आयरबी इ. तत्सम विभागातील पदाच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम. व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या न्यायिक सेवा( विधी) पदाच्या स्पर्धा परीक्षा व पोलीस/पदाच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य सेवा(राज्यप राजपत्रित ) स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम.( अनिवासी) संघ लोकसेवा आयोग मार्फत यूपीएससी घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दिल्ली (अनिवार) ऑनलाइन स्वरूपात अर्ज मागविण्यात येत आहे सदर योजनेचे सविस्तर तपशील शासनाच्या योजना संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित मार्फत करण्यात येण्यासारखे व्यवसाय- १ रिक्षा, २ चर्मोद्योग, ३ मिनीडोअर ४ रिक्षा -टेम्पो,४जिप,५ ट्रॅक्टर, ६ मिनी ट्रॅक्टर ७ कापड दुकान,८ किराणा दुकान,९ जनरल स्टोअर्स, १० सौंदर्य प्रसाधने, ११ ब्युटी पार्लर, १२ दवाखाना, १३ औषधाचे दुकान, १४ उपहारगृह, १५ टेलरिंग फार्म, १६ रेडीमेड गारमेंट, १७ हार्डवेअर, १८ वीट निर्मिती, १९ इलेक्ट्रिक दुकान, इतक्या दिवस याशिवाय इतर व्यवसाय ज्या व्यवसायापासून उत्पादन मिळेल अशा सर्व कायदेशीर व्यवसायासाठी लाभार्थी त्यांच्या पसंतीप्रमाणे कोणत्याही व्यवसायासाठी अर्ज करू शकतो. संस्था हे सर्व प्रामाणिकपणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री नामदेवराव आयवळे पुणे.

Featured Post

नमस्कार 🙏 महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेली **होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे (ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त)** ही संस्था अल्पावधीतच समाजाच्या विश्वासाचे केंद्र बनली आहे. संस्थेच्या अधिकृत वेबसाईटला एक *१, लाख ८0 हजारा पेक्षा अधिक भेटी** मिळाल्या असून, यावरून संस्थेच्या कार्याची पोहोच व विश्वासार्हता स्पष्ट होते. संस्था समाजाच्या गरजा ओळखून विविध उपक्रम राबवत आहे महाराष्ट्रातील सर्व विभागमध्ये कार्यशाळा पुणे विभागीय कार्यशाळा, नाशिक विभागीय कार्यशाळा, लातूर विभागीय कार्यशाळा ,छत्रपती संभाजी नगर विभागीय कार्यशाळा, नागपूर विभागीय कार्यशाळा, अमरावती विभागीय कार्यशाळा, कोकण विभागीय कार्यशाळा ,विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई व पुणे अशा संपूर्ण महाराष्ट्रात कार्य विस्तारत असून, समाजातील अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे. हे अत्यंत धाडसी, प्रामाणिक व समर्पित समाजसेवक असून, मर्यादित साधनसंपत्ती असतानाही स्वतःच्या कष्टातून व आर्थिक योगदानातून समाजसेवा करत आहेत. संस्थेमार्फत इतिहासात प्रथमच **होलार समाजासाठी स्वतंत्र विभागीय कार्यशाळा** आयोजित करण्यात आल्या. या कार्यशाळांमध्ये: • जात प्रमाणपत्र व जात वैधता पडताळणी प्रक्रियेचे मार्गदर्शन • समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती • स्वयं-सहाय्यता गट व युवक विकास मार्गदर्शन यासाठी संबंधित शासकीय विभागांना आमंत्रित करून मार्गदर्शन देण्यात आले. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, प्रतिनिधी व समाज बांधव सहभागी होऊन या कार्यशाळा यशस्वी ठरल्या. संस्थेचे प्रमुख उपक्रम: ✔ स्पर्धा परीक्षा अभियान ✔ महिला सशक्तीकरण अभियान ✔ जात पडताळणी व जात वैधता अभियान ✔ व्यसनमुक्ती अभियान ✔ युवक विकास अभियान ✔ सर्वधर्मसमभाव वधू-वर सूचक अधिकृत अभियान या सर्व उपक्रमांद्वारे समाजातील विविध समस्या सोडवून, समाजाच्या प्रगतीसाठी संस्था कटिबद्ध आहे. महाराष्ट्रभर फिरून प्रत्येक समाज बांधवाच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य अधिक व्यापक व प्रभावी होईल, याची खात्री आहे. धन्यवाद 🙏

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts