होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेने मागील पाच वर्षात भरीव कार्य केले असून आज होलार समाजाला पडणाऱे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची क्षमता या संस्थेमध्ये निर्माण झालेली आहे. ती वापरून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. 1 . ही संस्था अनुसूचित जाती अंतर्गत वंचित जाती मधील होलार समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी काम करते. 2 .आम्ही आमचे कामकाज IS0 -9001 : 2015 ह्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीच्या अनुसार काम करतो 2025 ला आंतरराष्ट्रीय IS0 प्रमाणपत्र मिळण्याच्या दिशेने संस्थेची वाटचाल सुरू 3 . आम्ही त्या प्रणालीत सातत्याने सुधारणा करण्यासाठी कार्यरत आहोत. 4 . आम्ही आम्हाला लागू असलेले भारताचे संविधान सर्व कायद्याचे पालन करतो. 5 . आम्ही वंचित जातीमध्ये होलार समाजासाठी त्यांच्या सर्व गरजांचे पालन करण्यास वचनबद्ध आहोत. 6 . शिका संघटित व्हा संघर्ष करा मी हमाली करीन मजुरी करीन वाटेल ते करीन पण मुला-मुलींना शिकवीन. 7 . डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे प्रसिद्ध विचार आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून आपण आपले जीवन सुधारू शकतो 8 . संघटित होऊन समक्षाचा मुकाबला करू शकतो. 9 . आणि संघर्षाच्या माध्यमातून समनता आणि अधिकार मिळू शकतो. 10 . विद्या हीच खरी शक्ती आहे शिक्षण हा आपल्या समाजात बदल घडवणारा शक्तीशाली मार्ग आहे. शिकण्याची ओढ आणि ज्ञान हे यशाचे खरे साधन आहे. 11 . स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व बाबासाहेबांच्या मते समाजात शांतता आणि प्रगती यायला हवी असेल तर स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व हे तत्वे अत्यंत महत्त्वाचे आहेत. 12 . स्वाभिमानाने जगा. स्वाभिमानाने जगणं महत्त्वाचं आहे. आत्म सन्मान आणि स्वाभिमानाने व्यक्तिमत्व बळकट होत. 13 . आपली ताकद ओळखा-बाबासाहेबांनी कायम लोकांना त्यांची क्षमता ओळखून आपले अधिकार मिळण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा सल्ला दिला. . 14 . निर्णय घेताना स्वतःच्या मनाला विचार करा. बाबासाहेब सांगतात की निर्णय घेताना स्वतःच्या अंतकरणाची प्रामाणिक राहणे आवश्यक आहे त्यामुळे निर्णययात शुद्धता राहते. 15 . बदल स्वीकारा आणि नवा विचार करा-समाजात बदल घडवण्यासाठी नवीन विचाराची गरज आहे. नवे विचार आणि नवीन तंत्रज्ञान स्वीकारणे हे यशस्वी जीवनाचे गमन आहे बाबासाहेबांचे विचार जाणून शिक्षण घेऊन संघर्ष करा आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल तर आपण निश्चितच यशस्वी होऊ
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-