होलार समाज सामाजिक संस्थेचे शिष्टमंडळ महाराष्ट्रातील होलार समाजाच्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी करताना येणाऱ्या अडचणी संदर्भात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी पुणे कार्यालय भेट दिनांक 28 .11. 2024 रोजी मा. रवींद्र कदम सर उपायुक्त तथा विभाग प्रमुख बार्टी मा. अनिल कारंडे सर उपजिल्हाधिकारी तथा विभागप्रमुख व स्नेहल भोसले मॅडम विभाग प्रमुख, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे. यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली त्यावेळी नामदेव आयवळे अध्यक्ष बोलत होते की महाराष्ट्रातील होलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या झालेल्या नोंदीमुळे होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता येत असलेल्या अडचणीमुळे होलार समाजाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही. होलार समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी बाबत अडचणीचे निरसन करून होलार समाजाला वेळेत व सुलभ रीतीने जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे ही मागणी आम्ही सातत्याने करत आलो आहोत त्यामुळे मिळालेले यश वरील काही अडचणी आल्यास समाज बांधवांनी होलार समाज सामाजिक संस्थेशी संपर्क साधावा योग्य मार्गदर्शन व मदत केली जाईल याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी मो.नं.7972140451 आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे
Featured Post
