दिनांक 18 .2. 2022 पासून संस्थेच्या वतीने गरीब गरजू हुशार विद्यार्थी दत्तक योजना लोकसहभागातून राबवित आहोत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची जेवणाची मोफत सोय पुणे येथे करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी शिबिर व मार्गदर्शन केले जाते ते पण तज्ञांकडून स्पर्धा परीक्षेस सक्षमपणे व आत्मविश्वास पूर्वक सामोरे जावे व त्यांचा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकास व्हावा या दृष्टीने संस्थेचे प्रामाणिकपणे प्रयत्न चालू आहेत. संस्थेच्या वतीने पुणे येथे गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी इयत्ता आठवी पासून ते बारावी पर्यंतचे मराठी आणि इंग्लिश मिडीयमचे क्लासेस मोफत सुरू करण्यात आले आहेत. संस्थेच्या वतीने महिला बचत गटांसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले तसेच शिल्प तयार करणे एलईडी बल टुबलाईट डेकोरेशन लाईट इत्यादी उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-