नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

मा. धम्मज्योती गजभिये साहेब व्यवस्थापकीय संचालक रोहिदास धर्मोउद्योग व चर्मकार विकास महामंडळ मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली होलार समाजातील उपस्थित मान्यवरावर यांच्या समवेत शुक्रवार दिनांक 28 .6. 2024 रोजी वंचित घटकातील होलार समाजाच्या विविध मागण्या सोडवण्यासंदर्भात विसरातवाडी समाज कल्याण महामंडळ कार्यालय पुणे येथे आयोजित करण्यात आली सदर बैठकीस लीडकॉम कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच होलार समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वप्रथम या बैठकीस आलेल्या सर्व होलार समाजातील प्रतिनिधीचे स्वागत केले. मा. व्यवस्थापकीय संचालक यांच्या विनंती अनुसार बैठकीसाठी आलेल्या होलार समाजातील बांधवांनी महामानव प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर या बैठकीचे अध्यक्ष या नात्याने माननीय व्यवस्थापकीय संचालक यांनी संत रोहिदास चर्मोउद्योग व चर्मकार विकास महामंडळाची माहिती सर्व उपस्थित मान्यवरांना देण्यात आली व शिष्टमंडळाने आपल्या मागण्या मांडव्यात असे मान्यवरांना सुचित केले श्री. नामदेवराव आयवळे हा समाज भूमिहीन समाज आहे. या समाजाचा मूळ रोजगार वाद्य वाजवणे साफसफाई कार्य राज्याची गंदगी साफसफाई चे व गटाईचे काम करीत आहे. हा पूर्वीपासून नोकरी, रोजगार, शिक्षण जात दाखला निवास राज्य सरकारच्या अनेक योजना पासून आज पर्यंत वंचित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शहराकडे चला असा नारा दिला पण या समाजाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे समाजाची परवड आज पर्यंत सर्व बाबतीत होत राहिली आहे. श्री. नामदेवराव आयवळे अध्यक्ष यांच्याप्रमाणे समाजातील भोसले मॅडम, पोपट ऐवळे, मंदा मॅडम, शोभा मॅडम, मनीषा नामदास,जगन्नाथ पारसे , महादेव पारसे वैभव नामदास इत्यादींनी आपली मत मांडली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी केलेल्या मागण्यावर मा.व्यवस्थापकीय संचालक यांनी सूचनावर गंभीरपूर्वक विचार करून संबंधित विभागांना होलार समाजातील मागण्याना न्याय मिळवून देण्यास लीडकाम कटिबद्ध असल्याचे सांगून होलार समाजाच्या लीडकॉम अंतर्गत संबंधित सर्व विभागाचे व्यवस्थापकीय यांना कारवाई करण्यात यावी असे आदेश देण्यात आले. महाराष्ट्रातील वंचित होलार समाजाच्या विविध मागण्या संदर्भात मा. व्यवस्थापकीय संचालक यांनी बैठकीदरम्यान गेलेल्या संबंधित विभागामार्फत कारवाही करण्यात यावी श्री.अ.गो शिंदे विभागीय अधिकारी यांना तथा यांनी उपस्थित मान्यवरांचा मार्गदर्शन करतेवेळी सर्व योजनेचा लाभ होलार समाजाला होईल यासाठी योजना विभागामार्फत प्रयत्न केले जातील व प्राधान्य देण्यात येईल. शेवटी श्री जगन्नाथ पारसे यांनी या बैठकीसाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच लिडकॉमचे कार्यालयातील उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानून वंचित होलार समाजाच्या विकासासाठी मा. धम्म ज्योती गजभिये साहेब संचालक यांच्या अध्यक्षतेखाली बैठकी ही एक ऐतिहासिक क्षण असल्याचे नमूद केले.

Featured Post

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts