तमाम महाराष्ट्रातील होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद वाटतो की होलार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने विविध मागण्या संदर्भात व अडचणींचे गंभीर्यने विचार करून संत रोहिदास धर्मोउद्योग व चर्मकार विकास महामंडळ मुख्य कार्यालय मुंबई येथे दिनांक 28 .6 .2024 रोजी विविध मागण्या संदर्भात नियोजन बैठक विश्रांतवाडी समाज कल्याण पुणे येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. मा. धम्मज्योती गजभिये साहेब व्यवस्थापकीय संचालक संत रोहिदास चर्मोउद्योग चर्मकार विकास महामंडळ यांच्या अध्यक्षतेखाली. त्यावेळी श्री नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष यांनी होलार समाजाला भेडसावणारे अडचणी हा समाज पूर्वीपासून नोकरी, रोजगार, शिक्षण जाती दाखला निवारा राज्य सरकारच्या अनेक योजना पासून आज पर्यंत वंचित आहे. तसेच काही अडचणी समाज बांधवांनी ही आपले मत व्यक्त केले साहेबांनी शांत चित्ताने ऐकून घेतले व मा. धम्मज्योती गजभिये साहेब व्यवस्थापकीय संचालक यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले त्यावेळी साहेबांनी मागण्याचा गंभीर विचारपूर्वक विचार करून मागण्या मान्य केल्या आणि संबंधित सर्व जिल्हा व्यवस्थापक, यांच्यावर जबाबदारी देण्यात आले व सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांना तात्काळ कृती आराखडा सादर करण्याचे आदेश माननीय धम्मज्योती गजभिये साहेब यांनी उपस्थित सर्व व्यवस्थापकीय यांना देण्यात आले आहे. काही ठळक मागण्या 1) संत रोहिदास चर्मउद्योग महामंडळाचे सर्व थकीत कर्ज बिना शर्त माफ करावे. काही कर्जावरील जाचक अटी रद्द करून सरळ पद्धतीने कर्ज देण्यात यावे. 2) वंचित होलार समाज गटरी कामगारांना महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत स्तरावर पीच परवाना व अपघात आरोग्य द्यावेत, 3) महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद, ग्रामपंचायत हद्दीत गटई कामगारांना व्यवसायासाठी स्टॉल दिले जावेत व जागा ही उपलब्ध करून द्याव्यात. 4) होलार समाजाच्या युवक युवुती व महिला बचत गटांना प्रशिक्षण कौशल्य विकास केंद्र सामूहिक सुविधा केंद्र क्लस्टर, शॉपिंग मॉल पुण्यामध्ये उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 5) अर्थसाह्य मिळण्याकरिता अर्जदाराने सर्व कागदपत्र जिल्हा कार्यालयामध्ये अर्जासह दिल्यानंतर दोन महिन्यांमध्ये कर्ज मिळावे. 6 महाराष्ट्रातील होलार समाजाचे प्रत्येक जिल्ह्याचे कर्ज प्रकरण तात्काळ मंजूर करण्यात यावी. अशा मागण्या होलार समाज सामाजिक संस्थेने केले आहेत लवकरच कार्यवाहीला सुरुवात होईल याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी काही अडचणी आल्यास सामाजिक संस्थेचे संपर्क साधावा मोबाईल नंबर 97 64 96 90 74
Featured Post
