नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज 31 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आवाहन सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गात लाभ घेण्याकरिता संबंधित उमेदवारास अर्ज करतेवेळी जात वैधता प्रमाणपत्र प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सन 2023-24 या चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 12 वी विज्ञान शाखेमध्ये व पदविका तृतीय वर्षात शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज शैक्षणिक संस्थेच्या शिफारसीसह दि. 31 जानेवारी 2024 पर्यंत समिती कार्यालयाकडे सादर करावेत. शैक्षणिक संस्थांनाही विद्यार्थी, पालक यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करून समितीकडे मुदतीत अर्ज सादर करण्याच्या सूचना निर्गमित कराव्यात, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी जयंत चाचरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. अर्जदारांनी bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज भरावा. महाविद्यालयीन शिफारसपत्र, 15A फॉर्मवर प्राचार्यांची सही, शिक्का व चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, जातीविषयक सर्व पुरावे व विहित नमुन्यातील शपथपत्रासह सर्व मूळ कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची हार्ड कॉपी कागदपत्रांच्या / पुराव्यांच्या साक्षांकित प्रतींसह समितीकडे सादर करावी. अर्ज सादर करतेवेळी अर्जदार / पालक यांनी समक्ष मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहनही श्री. चाचरकर यांनी केले आहे. 00000

Featured Post

📚 **स्पर्धा परीक्षा अभियान – English अभ्यास (मुलांसाठी)** 🏛 **होलार समाज सामाजिक संस्था, पुणे** 🗓 **कालावधी : ११ एप्रिल ते १५ एप्रिल २०२६ (विशेष अभ्यास आराखडा)** ──────────────────────────────────────── 📢 **सविस्तर अभ्यास नियोजन (Website साठी):** 🔹 **📅 दिनांक ११ एप्रिल २०२६** 👉 Parts of Speech (Noun, Pronoun, Verb) 👉 Basic Sentence Formation 👉 20 Vocabulary Words (Meaning + Use) 🔹 **📅 दिनांक १२ एप्रिल २०२६** 👉 Tense (Present Tense – Types & Examples) 👉 Fill in the Blanks Practice 👉 20 Vocabulary Words + Revision 🔹 **📅 दिनांक १३ एप्रिल २०२६** 👉 Tense (Past Tense – Types & Examples) 👉 Error Detection Practice 👉 Synonyms / Antonyms (20 Words) 🔹 **📅 दिनांक १४ एप्रिल २०२६** 👉 Future Tense + Sentence Practice 👉 Reading Comprehension (1 Passage) 👉 Vocabulary Revision + Daily Test 🔹 **📅 दिनांक १५ एप्रिल २०२६** 👉 Mixed Grammar Practice (All Topics Revision) 👉 Previous Year Questions (PYQ) 👉 Mini Mock Test (Analysis सहित) ──────────────────────────────────────── 📌 **विद्यार्थ्यांसाठी सूचना :** 1. दररोज दिलेला अभ्यास पूर्ण करणे आवश्यक आहे 2. Vocabulary वही स्वतंत्र ठेवावी 3. Mock Test नंतर चुका समजून घ्याव्यात 4. दररोज किमान 1 तास English सराव करावा 5. सातत्य ठेवा – यश नक्की मिळेल ──────────────────────────────────────── 🎯 **उद्दिष्ट :** विद्यार्थ्यांचा English विषय मजबूत करून स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणे ──────────────────────────────────────── 🌟 **प्रेरणादायी विचार :** *"रोज थोडं शिका, पण नियमित शिका!"* ✊ जय होलार समाज 🌐 holarsamajsamajiksanstha.blogspot.com ────────────────────────────────────────

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts