होलार समाज सामाजिक संस्था पुणे ( कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य) रजि. नं. एफ-- ५३४५२/ मूख्य कार्यालय सर्व्ह६३४ ( गणपत नगर बिबेवाडी पुणे) ३७ येथे विशेष सर्वसाधारण सभा नामदेवराव श्रीरंग आयवळे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी या सर्वानुमते मान्यता देण्यात आलेले आहेत ठराव क्रमांक 40 - होलार समाजाचा सामाजिक, आर्थिक व सर्वागीण विकास व्हावा, शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा, तसेच जातीचे दाखले , पडताळणी प्रमाणपत्रे काढताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी. संस्थेचे ध्येय उद्येश व नियमावली मान्य असणाऱ्या १८(अठरा) वर्षावरील कोणत्याही स्त्री/ पुरूष याना या संस्थेमध्ये महाराष्ट्रातील समाज बांधवांना समाज कार्य करण्याची मोठी संधी दिली जाणार आहे. प्रथम युवक युवतीना व महिलांना तसेच समाज कार्य करण्याची आवड आहे परंतु त्यांना संधीच मिळाली नाही असे बांधवांना जिल्हा अध्यक्ष या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत आज दिनांक २४/११/२०२३ ते ३०/१२/२०२३ या कालावधीमध्ये आपण अर्ज केलेले अर्ज स्विकारले जातील नंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी . जिल्हा. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, बिड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिय, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, या जिल्ह्यातील होलार समाज बांधवांनी संस्थेकडे अर्ज करावेत असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सचिन खजिनदार व संचालक मंडळाने केले आहेत. तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे संपर्क ७९७२१४०४५१ वर संपर्क साधावा
Popular Posts
-
-
होलार समाजासाठी विभागीय कार्यशाळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाली – छत्रपती संभाजीनगरात बार्टी व होलार समाज संस्थेचा उपक्रम छत्रपती संभाजीनगर, 10 जुलै 2025 – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती वस्ती सुधार योजना (बार्टी), पुणे व होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय विभागीय कार्यशाळेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले. ISO 9001:2015 प्रमाणित संस्थांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेचा मुख्य उद्देश जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र संदर्भातील अडचणी, बेरोजगारी, उद्योग धोरणे व युवा गट स्थापनेविषयी समाजाला योग्य मार्गदर्शन समाज कल्याण विभागाच्या विविध योजना होलार समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी सरकार, समाज, आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून समन्वय साधून विविध योजनेची अंमलबजावणी करणे हा कार्यशाळेचा उद्देश सामाजिक करणे हा होता. कार्यशाळेची सुरुवात थोर महापुरुषांच्या प्रतिमाचे मान्यवराच्या हस्ते पूजन करण्यात आले प्रमुख या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून बार्टी, पुणेचे अप्पर जिल्हाधिकारी व प्रशिक्षण विभाग प्रमुख, प्रकल्प व्यवस्थापक श्री. नितीन सहारे, सचिन नांदेडकर, संबंधित जिल्ह्यांचे उपविभागीय अधिकारी, कन्नड येथील प्रांत तहसीलदार, महसूल विभागाचे अधिकारी, जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य, समाजकल्याण विभागाचे अधिकारी, तसेच बार्टी संस्थेतील विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बार्टीचे श्री. नितीनजी सहारे सर यांनी सादर केले. त्यांनी प्रकल्पाच्या उद्देशांबाबत सविस्तर माहिती दिली. बार्टीच्या विविध योजना समजावून सांगितल्या उपविभागीय अधिकारी व तहसीलदार महसूल विभाग यांनी जात प्रमाणपत्र प्रक्रिया व येणाऱ्या अडचणींचे सखोल विश्लेषण केले. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेबाबत जिल्हा जात पडताळणी समिती, छत्रपती संभाजीनगर यांनी मार्गदर्शन केले. होलार समाजाचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे यांनी समाजाच्या प्रमुख अडचणी अधिकार्यांच्या समोर प्रभावीपणे मांडल्या. व होलार समाजाच्या विकासासाठी बार्टी पुणे मार्फत विशेषतः विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेतल्या जात इतिहास घडत आहे मा. सुनील वारे महासंचालक यांना व सर्व टीमचे समाज बांधवांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. अनेक समाजबांधवांनी देखील आपले प्रश्न प्रत्यक्षपणे मांडले. या संवादातून अनेक शंका दूर झाल्या व उपाययोजना सुचविण्यात आल्या. कार्यक्रमाचा समारोप व आभारप्रदर्शन श्री. नितीनजी सारे यांनी केले. या कार्यशाळेमुळे होलार समाजातील नागरिकांना प्रशासनाशी थेट संवाद साधता आला तसेच जात पडताळणी आणि रोजगाराच्या संधींबाबत मोलाचे मार्गदर्शन मिळाले सर्व कार्यक्रमाला उपस्थित समाज बांधव पदाधिकारी यांना संस्थेच्या वतीने धन्यवाद
-