प्रति. मा. धम्म ज्योती जय साहेब व्यवस्थापकीय संचालक (संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ. मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 26. 10 . 2023 रोजी वंचित घटकातील होलार समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच मागण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली सदर बैठकीस संत रोहिदास धर्मउद्योग व चर्मकार विकास महामंडळ मुंबई कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच होलार समाजाचे प्रतिनिधी उपस्थित मान्यवरांना दिली व शिष्टमंडळाने आपल्या मागण्या मांडाव्यात असे मान्यवरांना सूचित केले १. श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था पुणे:- महाराष्ट्रातील वंचित होलार समाजाला लीडकॉम संत रोहिदास चर्मोउद्योग महामंडळाने विकासाच्या मूळ प्रवाहात आणावे. आमची खात्री आहे लिड कॉमच आम्हाला न्याय देईल. २) बबनराव गणपती करडे. ३) श्री जगन्नाथ सुखदेव पारसे. ४) श्री मारुती चंदू कांबळे. ५) श्री बापूराव पांडुरंग कांबळे. ६) विजय शंकर केंगार ७) श्री राजू सोपान ऐवळे. ८) श्री पांडुरंग शंकर हातेकर. ९) श्री सिताराम विठ्ठल आवळे. १०) श्री विजय सिद्राम ऐवळे. ११) श्री विशाल जावीर. १२) श्री बाळासाहेब हेगडे. १३) महादेव पारसे. होलार समाजाच्या प्रमुख मागण्या. संत रोहिदास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या सर्व योजनांमध्ये सवलती वंचित होलार समाजाला मिळाव्यात. योजना -१ . ५० टक्के अनुदान योजना:- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकामार्फत ५०,०००/-पर्यंत गुंतवणूक असणाऱ्या व्यवसायासाठी सवलतीच्या व्याज दराने अर्थसहाय दिले जाते या अर्थ सहाय्यापैकी रू१०,०००/- किमान मर्यादीपर्यंत ५० टक्के कर्जाची रक्कम महामंडळ अनुदान म्हणून देते वरील कर्जाची परतफेड ३६ ते ६० समान मासिक हप्त्यात अथवा बँकेत ठरवून दिलेल्या इत्यादी बँकेकडे परतफेड करावी लागते त्यामध्ये सवलत मिळावी. २) बीज भांडवल योजना:- रक्कम रुपये ५०,००० ते ५ लाख पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्या कोणत्याही व्यवसायासाठी राष्ट्रीयकृत बँका मार्फत अल्पसंख्याजदराने कर्ज पुरवठा केला जातो या योजनेअंतर्गत स्वतः लाभार्थ्यांनी पाच टक्के रक्कम भरायची तसेच बँकेमार्फत 75 टक्के कर्ज पुरवठा केला जातो सदरच्या कर्जाची रक्कम रुपये १०००० ही महामंडळामार्फत अनुदान मिळते व उरीत रक्कम महामंडळामार्फत सदर कर्ज योजना दर चार टक्के आहे यामध्ये सवलती मिळाल्या. ३) प्रशिक्षण योजना:- सदर योजनेअंतर्गत महामंडळामार्फत सुशिक्षित युवकांना प्रशिक्षण देण्यात येते त्याप्रमाणे संगणक प्रशिक्षण अंतर्गत मूळ संगणक प्रणाली या कोर्सेस चे प्रशिक्षण दिले जावे. ४) गटई स्टॉल योजना:- रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या होलार समाजातील लाभार्थ्यांना गटई स्टॉल पुरवण्याची १०० टक्के अनुदान तत्त्वावर, आयुक्त कल्याण पुणे व महामंडळामार्फत देण्यात यावे. ५) थेट कर्ज योजना:- या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांना बँकेऐवजी महामंडळामार्फत रक्कम रुपये ५०,००० रुपयापर्यंत व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो. त्यासाठी व्याजदर व त्याची परतफेड 36 ते 60 हप्त्यामध्ये परतफेड करावी लागते त्यात काही सवलत मिळावी. ६) प्लास्टर योजना;- सदर योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात उभारला जाणारा व्यवसाय म्हणजे प्रिंटिंग प्रेस चप्पल कारखाना एलईडीवर डाळ मिल कापसाच्या वाती पिठाची गिरणी तसेच इतर उद्योग धंद्यांना प्रोत्साहन आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यात यावा. ७) केंद्र शासनाच्या योजना- यामध्ये सवलती मिळण्यात मुदतीत कर्ज योजना सक्षम पतपुरवठा योजना महिला समुद्री योजना महिला किसान योजना शैक्षणिक कर्ज योजना होलार समाजातील वाजंत्री कलाकारांसाठी इत्यादी खरेदी करण्यासाठी कर्ज तसेच अनुदान द्यावे तसेच पेन्शन देऊन सक्षम करावे ८) ज्येष्ठ नागरिक योजना स्वावलंबी योजनेअंतर्गत नागरिकांना सावलीतच्या दराने कर्ज द्यावे ९) गेल्या 70 वर्षात होलार समाजाला राज्य पातळीवर नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही आपल्या माध्यमातून महामंडळामार्फत होलार समाजाचे दोन प्रतिनिधी महामंडळावर सदस्य म्हणून घ्यावेत श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे व श्री बबनराव करडे ही विनंती. १० होलार समाजातील महिलांसाठी महिला बचत गटांना सवलतीच्या दरात कर्ज तसेच अनुदान मिळावे. ११) मौजे अमलापुर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे संस्थेकडे वीस गुंठे जागा आहे तिथे मला समाजातील वंचित मुला मुली साठी गरीब गरजू होतकरू स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी पोलीस व मिलिटरी भरती रेल्वे बँक एलआयसी इत्यादी विद्यार्थ्यांसाठी वस्तीग्रह बांधण्याचे संस्थेचे नियोजन आहे परंतु यासाठी सामाजिक न्याय विभागाला आपल्या मंडळामार्फत सहायक आयुक्त प्रस्ताव पाठवावा विनंती १२) वंचित होलार समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या तसेच इतर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका अभ्यासिका तयार करण्यासाठी अनुदान योजना अंतर्गत होलार समाजाला जास्तीत जास्त त्याचा लाभ मिळावा .
Featured Post
