नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  


 होलार समाज सामाजिक संस्था पुणे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य रजि नं.एफ 53452/2023 

विशेष सर्वसाधारण सभा दि. 5 /11./ 2023  रोजी संस्थेचे मुख्य कार्यालय गणपती नगर बिबेवाडी पुणे येथे संपन्न होत असताना खालील विषयावर चर्चा करण्यात आली 

सभेचे अध्यक्ष श्री भगवान हरीबा जावीर गुरुजी यांनी भूषवले तर खालील विषयावर चर्चा करण्यात आली .

विषय:- ठराव नं. क्र.40 


गाव पातळीवर समाज मंदिरामध्ये ग्रंथालय अभिषेक वाचनालय सुरू करण्यात येणार संस्थेकडे संपर्क साधावा.


 संत रोहिदास चर्मोउद्योग महामंडळाकडे व्यवसायासाठी अर्थसहाय्य मिळण्याकरिता समाज बांधवांनी जास्तीत जास्त अर्ज महामंडळाकडे करण्यात यावे 


जातीचे दाखले व जात पडताळणी दाखले मिळण्याकरिता होणारी अडचणी बाबत संस्थेकडे संपर्क साधावा आम्ही तुम्हाला मदत करू


स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थ्यांनी बार्टीच्या वेबसाईटला सतत भेट द्यावी कारण सर्व माहिती मिळेल. काही अडचणी आल्यास संस्थेकडे संपर्क साधावा. 


होलार समाज हा अनुसूचित जाती 

प्रवर्गातील अत्यंत मागासलेला समाज  असून या समाजातील शैक्षणिक प्रगती अजूनही पुरेशी झालेली नाही. संस्था शिक्षणाकडे लक्ष देणार.


ह्या सर्वांनुमते  मान्यता देण्यात आलेले आहेत . त्यावेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.


आपला विश्वासू

तुमच्या हक्काचा माणूस

श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे .

संपर्क नंबर 97 64 96 90 74

Featured Post

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts