नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

होलार समाजातील युवक - युवती साठी लघु उद्योग मार्गदर्शन मंगळवार दिनांक 17 नोव्हेंबर 2020 रोजी

 *होलार समाजातील युवक -युवती साठी लघु उद्योग मार्गदर्शन*

           होलार  समाजाच्या सर्वांगीण  विकासासाठी  कार्यरत असणारे व समाजासाठी तळमळ असणारे श्री नामदेवराव आयवळे यांनी ' *होलार समाज सामाजिक संस्था* ' स्थापन करुन त्या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. प्रत्येक गावातील माणूस यांना कार्याच्या रुपाने ओळखतो आहे. समाजात जिथं अन्याय होतो तिथे हे हजर असतात.याशिवाय महिला उद्योग समूहातुन एल इडी बल्ब,थ्री इन वन कलर ट्युबलाईट असे लघु उद्योग तसेच स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, पहिली  ते दहावी पर्यंत शैक्षणिक समूहातुन अभ्यास, मुलामुलींची लग्न जुळवण्यासाठी  'रेशीम गाठी ' समुह,

होलार सामाजिक संस्था या नावाने संस्थेच्या दोन स्वतंत्र वेबसाईट आहेत.  या वेबसाईटवर विविध शासकीय माहिती वेबसाईट च्या माध्यमातून दिली जाते. आज अखेर 17349 लोकांनी भेट दिली आहे . त्या जोरावर  संस्थेचे कार्य खुप मोठ्या प्रमाणावर चालू आहे. अनेक उपक्रम चालू 

आहेत.               

         आता ही संस्था  ग्रामीण भागात ही कार्य करू लागली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यानी सांगोला तालुक्याची निवड केली आहे. सांगोला येथे संस्थेचे संपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात पहिला उपक्रम म्हणुन लघु उद्योग मार्गदर्शन करणार आहेत. जे गरजू व होतकरू  तरूण  - तरूणी आहेत त्यांनी  या मार्गदर्शन चा अवश्य लाभ घ्यावा. हे मार्गदर्शन मंगळवार दिनांक 17नोव्हेंबर 2020 रोजी न्यू इग्लिश स्कूल येथे दुपारी ठीक 12-30 वाजता सुरू होईल. साधारणपणे दहावी पर्यंत शिक्षण झालेले तरुणासाठी व समाजातील इतरांनसाठी ही संधी  " *होलार  समाज सामाजिक संस्था शाखा  सांगोला* " या संस्थेने  तुमच्या पर्यंत आणली आहे तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी संधिचा फायदा घ्यावा. अधिक माहितीसाठी 7744905750  या क्रमांकावर संपर्क साधावा असे सांगोला तालुका अध्यक्ष यांनी आवाहन केले आहे.

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts