नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श माता गौरव पुरस्कार 30 महिलांना गौरव पुरस्कार देण्यात आला


होलार समाज सामाजिक संस्था, पुणे 
नोंदणी क्र एफ 53452 पुणे 
( कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य )

संस्थेच्या वतीने शनिवार दिनांक.
04/01/2020 रोजी, ठिकाण गोपीनाथ मुंडे अभ्यासिका बिबवेवाडी, पुणे. दुपारी 3 वाजता 
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विविध समाजातील महिलांसाठी भव्य मेळावा संपन्न झाला. 
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श माता गौरव पुरस्कार 30 
महिलांना गौरव पुरस्कार देण्यात आला 
मा. श्री. सुनिलभाऊ कांबळे, साहेब 
आमदार 
यांच्या शुभहस्ते 
मा. श्री. भगवान जावीर, गुरूजी 
यांच्या प्रमुख उपस्थितीत 
महिलांना ट्रॉफी, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव पुरस्कार देण्यात आला. 
त्यावेळी 
मा श्री राजेंद्र आबा शिळमकर नगरसेवक 
मा श्री सतोष सुरगुडे साहेब सरपंच आबी 
मा श्री पृथ्वीराज बावीकर साहेब 
सौ अॅड सुरेखा कदम मॅडम 
मा श्री अॅड जि एन ऐवळे पुणे जिल्हा व सत्र न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ 
मा श्री गणेश नामदास साहेब 
मा श्री दिलीप करडे नेते 
मा श्री राजेंद्र केगार साहेब 
याच्या प्रमुख उपस्थितीत गौरव पुरस्कार देण्यात आला 
तसेच  
आपल्या सर्वांच्या जिवनात मातेचे  
महत्वपूर्ण योगदान आहे विविध 
समाजातील कित्येक माता अशिक्षीत असुनही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असतानाही त्यांनी विद्यात्याचे आपल्या मुलां मुलींना दालन खुले करण्यासाठी अपार कष्ट डोंगराएवढी मेहनत केली आहे, त्यांच्या प्रती आदरभाव निर्माण व्हावा समाजापूढे त्याचा आदर्श निर्माण व्हावा हा उद्देशाने त्याना सावित्रीबाई फुले आदर्श माता पुरस्कार म्हणून आपणास होलार 
समाज सामाजिक संस्था, पुणे  
नोंदणी क्र एफ 53452 पुणे 
तर्फे 
सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येत आहे, 
आपल्या भावी जीवनातील यशस्वी कार्यासाठी मनःपूर्वक सस्नेह हार्दिक शुभेच्छा धन्यवाद...

आपला सेवक 
नामदेवराव श्रीरंग आयवळे, पुणे 
गौरव पुरस्कार देते वेळी



Featured Post

निःशुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम – बार्टी पुणे आयोजक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे सहकार्याने: श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, संस्थापक अध्यक्ष – होलार समाज सामाजिक संस्था, पुणे कार्यक्रमाचे स्वरूप: कालावधी: 1 महिना (अनिवासी) फी: पूर्णतः मोफत (निःशुल्क) ठिकाण: महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण जिल्हा निहाय एक दिवसीय परिचय मेळावा आयोजित प्रशिक्षणाचे उद्दिष्ट: अनुसूचित जातीतील युवक-युवतींना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक त्या सर्व कौशल्यांचे प्रशिक्षण देणे. प्रशिक्षणातील प्रमुख विषय: उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास कारखाना भेटी उद्योगासाठी नोंदणी व परवाने स्टार्टअप इंडिया / स्टँडअप इंडिया मुद्रा योजना / मेक इन इंडिया यशस्वी उद्योजकांशी चर्चा उद्योग निवड व उभारणी प्रक्रिया बाजारपेठेचे सर्वेक्षण महिला उद्योजकांसाठी धोरण प्रकल्प अहवाल तयार करणे निधी उभारणीचे मार्ग कर्ज योजना / महामंडळांच्या योजना कंपनी नोंदणी व प्रक्रिया विक्री व व्यवस्थापन कौशल्य अभिप्रेरणा प्रशिक्षण विविध क्षेत्रातील उद्योग संधी (कृषी, खाद्य, केमिकल, प्लास्टिक इ.) आवश्यक कागदपत्रे (प्रत्येकी 2 झेरॉक्स): जातीचा दाखला आधार कार्ड शाळा सोडल्याचा दाखला / मार्कलिस्ट पॅनकार्ड 2 पासपोर्ट साईज फोटो पात्रता निकष: जात: अनुसूचित जाती (SC) वय: 18 ते 45 वर्ष शिक्षण: किमान 8वी पास महाराष्ट्रातील रहिवासी: किमान 15 वर्षे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असावी कोणत्याही बँकेचा/संस्थेचा डिफॉल्टर नसावा (क्रेडिट स्कोअर चांगला असावा) महिलांना प्राधान्य अर्ज व माहिती कशी मिळवावी: बार्टी पुणे वेबसाइटला भेट द्या: https://barti.maharashtra.gov.in जिल्हा प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क करा किंवा संपर्क साधा: श्री. नामदेवराव आयवळे मो. 97649 69074 (होलार समाज सामाजिक संस्था, पुणे) निवड प्रक्रिया: जिल्हा निहाय मेळावा होईल अर्ज व कागदपत्रांची तपासणी मुलाखतीच्या आधारे निवड

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts