महाराष्ट्र टाईम्स, पुणे बुधवार 30 जुलै 2014 रोजी
नामदेवराव आयवळे, पुणे यांनी केलेला संघर्ष,
राज्यातील होलार समाजाचा स्वतंत्र अभ्यास आयोग नेमावा आणि या समाजातील नागरिकांच्या झालेल्या जातीच्या चुकीच्या नोंदी दुरूस्त कराव्यात, या प्रमुख माण्यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा
नामदेवराव आयवळे, पुणे यांनी
पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
होलार समाजाचे
पदधिकारी या वेळी उपस्थित होते.
समाजाच्या मागण्या 30 जुलैपर्यंत मान्य झाल्या नाहीत तर पुण्यासह राज्यात इतर ठिकाणी
रस्ता रोको आंदोलन करू असे
संघटनेचे म्हणणे आहे, होलार
समाजातील एकाच घरातील विविध व्यक्तींच्या वेगवेगळ्या
जातीमध्ये नोंदी करण्यात आल्या
असुन या नोंदी सुधारण्यात याव्यात अशी मागणी नामदेवराव आयवळे, पुणे यांनी
पत्रकार परिषदेत केली, तसेच
होलार समाजाचा स्वतंत्र अभ्यास आयोग नेमावा या समाजाच्या प्रगतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे,
होलार समाजाच्या वाद्य कलावंताना दरमहा 7 रूपये मानधन मिळावे, या समाजाच्या नागरिकांना गायरान जमिनी करण्यासाठी दिल्या जाव्यात, यासह विविध मागण्या नामदेवराव आयवळे, पुणे यांनी
महाराष्ट्र शासनाकडे मांडल्या आहेत.