नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

सोलार समाजातील बावन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा लाभ

 🚩🌺 होलार समाजाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश! विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधींचे नवे दालन खुले! 🌺🚩


🎓 UPSC व MPSC स्पर्धा परीक्षा योजनेंतर्गत होलार समाजातील ५२ विद्यार्थ्यांना लाभ!


होलार समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व सर्वांगीण विकासासाठी होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करीत आहे.


📌 दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत होलार समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात २३ मुद्द्यांवर चर्चा व मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी संस्थेने वेळोवेळी निवेदने देऊन सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.


📄 याच पाठपुराव्याच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI), पुणे यांच्याकडून प्राप्त अधिकृत पत्रानुसार, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या UPSC, MPSC, JEE, NEET इत्यादी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजनेंतर्गत ५% आरक्षणाची तरतूद आहे. या योजनेत होलार समाजाचा समावेश असून, मागील तीन वर्षांच्या कालावधीत होलार समाजातील एकूण ५२ विद्यार्थ्यांना लाभ मिळाल्याची अधिकृत माहिती प्राप्त झाली आहे.


📊 ५२ विद्यार्थी हा मागील तीन वर्षांचा एकत्रित आकडा आहे; दरवर्षीचा आकडा नाही. समाजासमोर वस्तुस्थिती आणि अधिकृत माहिती मांडणे ही संस्थेची भूमिका आहे.


🌟 ही उपलब्धी महत्त्वाची असली, तरी तीन वर्षांच्या कालावधीत लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची गरज आहे. समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी UPSC, MPSC व इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुढे यावे, शासनाच्या प्रशिक्षण योजनांची माहिती घ्यावी आणि उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, यासाठी संस्था यापुढेही सातत�

Featured Post

सोलार समाजातील बावन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा लाभ

 🚩🌺 होलार समाजाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश! विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधींचे नवे दालन खुले! 🌺🚩 🎓 UPSC व MPSC स्पर्धा परीक्षा यो...

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts