🎓 *विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न – आता समाज एकत्र येण्याची वेळ!* 🎓 🏛 *होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे* ✨ *ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था* ✨ 👤 *संस्थापक अध्यक्ष : आदरणीय श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे* 📢 *महाराष्ट्रव्यापी शिक्षण, विद्यार्थी हक्क व समाज प्रबोधन महाअभियान २०२६* आज महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी आणि पालक विविध शासकीय प्रक्रियांमुळे अनेक अडचणींचा सामना करत आहेत. ⚠️ जात प्रमाणपत्र मिळण्यास विलंब ⚠️ जात वैधता (पडताळणी) प्रकरणे प्रलंबित ⚠️ वसतिगृह प्रवेशातील अडचणी ⚠️ शिष्यवृत्ती व फी परतावा समस्यांचे प्रश्न ⚠️ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा अभाव ⚠️ स्पर्धा परीक्षा व करिअर संदर्भातील माहितीचा अभाव ⚠️ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ 📚 *शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत हक्क आहे. कोणताही विद्यार्थी केवळ माहितीच्या अभावामुळे किंवा प्रशासकीय अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, हीच संस्थेची भूमिका आहे.* यासाठी संस्था महाराष्ट्रभर खालील विषयांवर जनजागृती, मार्गदर्शन आणि समाज संघटनाचे कार्य करत आहे. ✅ जात प्रमाणपत्र व जात पडताळणी मार्गदर्शन ✅ शिष्यवृत्ती व फी परतावा माहिती ✅ शासकीय वसतिगृह प्रवेश मार्गदर्शन ✅ स्पर्धा परीक्षा व करिअर सल्ला ✅ कौशल्य विकास व रोजगार माहिती ✅ शिक्षण हक्क व संविधानिक जागरूकता ✅ विद्यार्थी, पालक व समाज प्रबोधन ✅ ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन उपक्रम 🌍 *समाजाचा विकास शिक्षणातूनच होतो आणि शिक्षित समाजच स्वाभिमानी समाज घडवतो.* अत्यंत आनंदाची बाब म्हणजे संस्थेच्या समाजहिताच्या कार्याला मिळालेल्या प्रतिसादामुळे अधिकृत वेबसाईटला *१,३८,०३३ पेक्षा अधिक भेटी* प्राप्त झाल्या आहेत. हा समाजाच्या विश्वासाचा आणि जागृतीचा भक्कम पुरावा आहे. 📚 समाजहिताचे उपक्रम, मार्गदर्शन साहित्य आणि महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी संस्थेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 🌐 [https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/?m=1](https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/?m=1) 🌐https://holarsamajssp.blogspot.com/ 📲 हा संदेश जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक आणि समाजबांधवांपर्यंत पोहोचवा. 🤝 *विद्यार्थी वाचला तर समाज घडेल...* 🤝 *शिक्षण वाढले तर भविष्य उज्ज्वल होईल...* 🤝 *एकत्र येऊया – शिक्षणाला बळ देऊया – समाज घडवूया...* 💙 *जय भीम • जय संविधान • जय भारत • जय होलार* 💙
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-