🚨 *२१ जून ते ३० जून २०२६ विशेष मोफत जनजागृती, अभ्यास व मार्गदर्शन अभियान* 🚨 🌟 *होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे* 🌟 *(ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था)* 👤 *संस्थापक अध्यक्ष : श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे* 📢 समाजाच्या सर्वांगीण शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विकासासाठी संस्था राज्यस्तरावर *१० समाजहित विकास अभियाने* राबवत आहे. 📅 *दिनांक २१ जून ते ३० जून २०२६* या कालावधीत समाज बांधव, युवक-युवती, महिला, विद्यार्थी व नागरिकांसाठी *विशेष मोफत जनजागृती, मार्गदर्शन व सहाय्य अभियान* आयोजित करण्यात आले आहे. 🏆 *राज्यस्तरीय १० समाजहित विकास अभियाने* 1️⃣ *स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियान* मार्गदर्शक : *सौ. सारिका रुपेश हातेकर* (बँक मॅनेजर व संस्थेच्या सहसचिव) 2️⃣ *महिला सशक्तीकरण अभियान* मार्गदर्शक : *सौ. शोभा नामदेव अहिवळे* (संस्थेच्या उपाध्यक्ष) 3️⃣ *होलार समाज जात प्रमाणपत्र व जात पडताळणी मार्गदर्शन अभियान* मार्गदर्शक : *श्री. बबनराव करडे* (मा. नायब तहसीलदार व संस्थेचे सल्लागार) 4️⃣ *स्वावलंबन, पत्र्याचे स्टॉल व्यवसाय, रोजगार व करिअर कौशल्य विकास अभियान* मार्गदर्शक : *अॅड. जी. एन. ऐवळे* (जेष्ठ विधिज्ञ तज्ञ, पुणे जिल्हा व सत्र न्यायालय तथा संस्थेचे कायदेविषयक सल्लागार) 5️⃣ *समाजभूषण कै. भगवान जावीर गुरुजी व्यसनमुक्ती अभियान* मार्गदर्शक : *प्रा. रविकांत आदरकर* 6️⃣ *सर्वधर्मसमभाव वधू-वर सूचक अभियान* मार्गदर्शक : *सौ. वनिता करडे, पुणे* 7️⃣ *महायोजना मार्गदर्शन अभियान* (शासकीय योजना माहिती व लाभ सहाय्य) मार्गदर्शक : *श्री. सिताराम ऐवळे, पुणे* 8️⃣ *करिअर, कौशल्य विकास, व्यक्तिमत्त्व विकास व मुलाखत तयारी अभियान* मार्गदर्शक : *तज्ञ सुहास गोळे सर, पुणे* 9️⃣ *आरोग्य सेवा व आरोग्य जनजागृती अभियान* मोफत आरोग्य मार्गदर्शन, तपासणी व जनजागृती 🔟 *समाजहित शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक अभियान* मार्गदर्शक : *प्रा. रविकांत आदरकर* 📚 शिक्षण • 💼 रोजगार • 👩 महिला सशक्तीकरण • ⚖️ सामाजिक न्याय • 🏥 आरोग्य • 🚭 व्यसनमुक्ती • 🚀 सर्वांगीण प्रगती 🌐 *संस्थेच्या अधिकृत वेबसाईट :* [https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/?m=1](https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/?m=1) [https://holarsamajssp.blogspot.com/](https://holarsamajssp.blogspot.com/) 📲 *स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अधिकृत WhatsApp ग्रुप :* [https://chat.whatsapp.com/EV2I7zU83BzBQeVu9UA0Q7](https://chat.whatsapp.com/EV2I7zU83BzBQeVu9UA0Q7) 🤝 *आपला सहभाग – समाजाचा विकास* 🙏 चला, शिक्षित, संघटित, स्वावलंबी आणि प्रगत समाज घडवूया. ✊ *जय भीम • जय संविधान* ✊ 💐 *संकल्पना व मार्गदर्शन* *श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे* संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-