🌸✨ *भव्य भूमिपूजन व पायाभरणी समारंभ* ✨🌸 🏛️ *होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे* 📜 *ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था* 🌺 *संस्थापक अध्यक्ष :* *मा. श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे* ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📢 *जाहीर सूचना* 📢 होलार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने मौजे *कमलापूर, ता. सांगोला, जि. सोलापूर* येथे उभारण्यात येणाऱ्या 🏢 *“होलार समाज मातोश्री शिक्षण व प्रशिक्षण भवन”* या महत्त्वाकांक्षी वास्तूच्या *भूमिपूजन व पायाभरणी समारंभाचे* आयोजन करण्यात आले आहे. 🗓️ *दिनांक :* शनिवार, 30 मे 2026 ⏰ *वेळ :* सायंकाळी 5:00 वाजता 📍 *स्थळ :* मौजे कमलापूर, वासुद रोड, ता. सांगोला, जि. सोलापूर मान्यवरांच्या शुभहस्ते या वास्तूचे भूमिपूजन करून समाजासाठी भव्य इमारत उभी करण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकण्यात येणार आहे. 🙏 ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🎯 *संस्थेचा उद्देश* 🎯 समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी या भवनामार्फत पुढील उपक्रम राबविण्यात येणार आहेत : ✅ प्रशिक्षण केंद्र ✅ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ✅ संगणक व कौशल्य विकास प्रशिक्षण ✅ महिला प्रशिक्षण केंद्र ✅ सांस्कृतिक भवन ✅ सभा व लग्न समारंभ सुविधा ✅ बालवाडी व अभ्यासिका ✅ योगा केंद्र ✅ पोलीस व मिलिटरी भरती प्रशिक्षण ✅ SET / NET / JEE / NEET मार्गदर्शन ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🌹 समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी उभारण्यात येणाऱ्या या उपक्रमास सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून सहकार्य करावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती. 🌹 🙏 आपली उपस्थिती हेच आमचे बळ 🙏 ✨ *“समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण, संस्कार आणि संघटन”* ✨
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-