🌸 *नमस्कार सज्जनहो,* 🌸 🏆 *अभिमानाचा क्षण!* होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांना एप्रिल २०२५ मध्ये प्राप्त झालेले 📜 *ISO 9001:2015* हे आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन मानांकन कायम राखण्यासाठी दिनांक *९ एप्रिल* रोजी आयोजित तृतीय पक्ष (Audit) परीक्षण यशस्वीरीत्या पार पडले. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👤 *संस्थापक अध्यक्ष* *श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे* यांच्या अध्यक्षतेखाली हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला. या परीक्षणासाठी *ऑडिटर डॉ. सुरेश माळी सर* उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण ऑडिट प्रक्रियेचे उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शन व निरीक्षण केले. तसेच संस्थेचे मार्गदर्शक व मान्यवरांची उपस्थिती लाभली: * जीवन सल्लागार: *श्री. सुहास गोळे सर* * सल्लागार: *मा. बबनराव करडे (नायब तहसीलदार)* * खजिनदार: *श्री. जगन्नाथ पारसे* * उपाध्यक्ष: *शोभा मॅडम* * सदस्य: *अनिल गुळदगड, वनिता रमेश करडे, सविता केंगार, आत्माराम जावीर, सिताराम ऐवळे, शिवकुमार डोंबे* ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔍 परीक्षणादरम्यान संस्थेच्या वर्षभरातील कामकाजाचे सखोल मूल्यमापन करण्यात आले. 👉 *डॉ. माळी सरांनी संस्थेच्या कामाचे कौतुक करत संस्था ISO च्या सर्व निकषांनुसार उत्कृष्ट कार्य करत असल्याचे नमूद केले.* 👉 तसेच काही आवश्यक सुधारणा सुचवून पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. 📢 *महत्त्वाची घोषणा:* संस्थेचे *ISO 9001:2015 मानांकन कायम असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.* 📨 पुढील २–३ दिवसांत संबंधित अधिकृत प्रमाणपत्र व पत्र संस्थेला प्राप्त होणार आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🙏 *कार्यक्रमाच्या शेवटी उपाध्यक्ष शोभा मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.* 💪 *ही यशस्वी कामगिरी सर्व सभासद, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे.* 🙏 सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🙏 *धन्यवाद!* 🙏 ✍️ — *संस्थेचे संचालक *श्री. आत्माराम जावीर साहेब
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-