नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

*होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे* *(ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था)* *संस्थापक अध्यक्ष:* श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे महाराष्ट्रातील सर्व मान्यवर समाज बांधवांना मनःपूर्वक नमस्कार 🙏 आपला विश्वास, सहकार्य आणि सातत्यपूर्ण पाठिंबा यामुळेच दिनांक 31 मार्च 2026 अखेर आमची यशस्वी वाटचाल शक्य झाली आहे. होलार समाजाच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी संस्था शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत असून, त्याच अनुषंगाने *डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे* यांच्या माध्यमातून विविध विभागीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे यांच्या नेतृत्वात पुणे, नाशिक, लातूर, छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथे कार्यशाळा पार पडल्या. या माध्यमातून हजारो समाज बांधवांच्या समस्या सोडवण्यात यश आले. *संस्थेचे प्रमुख उपक्रम व त्याचा लाभ:* • स्पर्धा परीक्षा अभियान – 160 विद्यार्थी लाभार्थी • महिला सशक्तिकरण अभियान – 170 महिला लाभार्थी • जात प्रमाणपत्र व पडताळणी अभियान – 204 लाभार्थी • व्यसनमुक्ती अभियान (कै. भगवान जावीर गुरुजी स्मरणार्थ) – 120 लाभार्थी • स्वावलंबन पत्र्याचे स्टॉल (रोजगार अभियान) – 45 लाभार्थी • सर्वधर्मसमभाव वधू-वर सूचक अभियान – 174 लाभार्थी • मार्गदर्शन व माहिती अभियान – हजारो लोक लाभार्थी आजपर्यंत महाराष्ट्रभरातून *9,298 सभासदांची नोंदणी* झाली असून, हीच आमची खरी ताकद आहे. संस्थेची अधिकृत वेबसाईटला *1,10,206 लोकांनी भेट* दिली असून, अल्पावधीत मिळालेला हा प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आपण दाखवलेला विश्वास आणि प्रेम हीच आमची उर्जा आहे. याच विश्वासाच्या बळावर आम्ही भविष्यातही अधिक उत्कृष्ट आणि परिणामकारक सेवा देण्याचा निर्धार करतो. आपले असेच प्रेम, सहकार्य आणि आशीर्वाद कायम राहू द्या 🙏 *धन्यवाद!* *संस्थेचे पदाधिकारी:* सचिव – अर्जुन खांडेकर सल्लागार – बबनराव करडे (नायब तहसीलदार) कायदे सल्लागार – अॅड. जी. एन. ऐवळे (ज्येष्ठ विधीज्ञ) उपाध्यक्ष – शोभा ऐवळे खजिनदार – जगन्नाथ पारसे सहसचिव – सारिका रुपेश हातेकर

Featured Post

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts