नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

**प्रमाण-विचार**दिनांक 16 .4.2026 . कुठल्याही व्यक्ती, संस्था किंवा संघटनेने आपल्या कार्याचा उद्देश, स्वरूप व व्याप्ती यांचे स्पष्ट भान ठेवून तसेच अंतर्बाह्य प्रभावकारी परिस्थिती, अंतर्गत व बाह्य हितसंबंधीयांच्या गरजा व अपेक्षा यांचा योग्य विचार करूनच आपले कार्य करणे आवश्यक आहे. या तत्त्वांच्या आधारे कार्य केल्यास संस्थेची गुणवत्ता, पारदर्शकता व विश्वासार्हता अधिक दृढ होते. होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे ही संस्था ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तापूर्ण, शिस्तबद्ध व समाजाभिमुख कार्य करण्यास कटिबद्ध आहे. संस्थेच्या सर्व उपक्रमांमध्ये गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीच्या तत्त्वांचे पालन करून सातत्यपूर्ण सुधारणा, उत्तरदायित्व आणि समाजहित यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाते.

Featured Post

📢 *महाराष्ट्रातील सर्व होलार समाज बांधवांना महत्त्वाचे आवाहन* 📢 होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे IS0 9001 2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील होलार समाज बांधवांच्या विविध शासकीय, आर्थिक, शैक्षणिक व महामंडळाशी संबंधित अडचणींचा राज्यस्तरीय आढावा घेण्यात येत आहे. याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी. सध्या अनेक समाज बांधवांना खालीलप्रमाणे विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे: * कर्ज प्रकरण मंजूर असूनही रक्कम न मिळणे * अर्ज करूनही कर्ज मंजूर न होणे * प्रलंबित कर्ज प्रकरणे * व्यवसायासाठी मदत न मिळणे * प्रशिक्षण योजनांचा लाभ न मिळणे * स्टॉल / परवाना संदर्भातील समस्या * शिष्यवृत्ती / शैक्षणिक योजनांमधील अडचणी * शासकीय योजनांची माहिती न मिळणे * महामंडळ कार्यालयीन कामांमध्ये अडचणी * इतर सामाजिक, शैक्षणिक किंवा आर्थिक समस्या तरी महाराष्ट्रातील ज्या समाज बांधवांना अशा प्रकारच्या समस्या किंवा अडचणी आहेत त्यांनी आपली संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे पाठवावी: 📌 *आवश्यक माहिती:* १) पूर्ण नाव २) गाव / तालुका / जिल्हा ३) मोबाईल नंबर ४) कोणत्या योजनेसाठी अर्ज केला आहे ५) अडचणीचे स्वरूप ६) अर्ज क्रमांक / कागदपत्रे (असल्यास) समाज बांधवांकडून प्राप्त होणाऱ्या सर्व अडचणी व प्रलंबित प्रश्न एकत्रित करून संबंधित स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असून ते प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. ⚠ *जास्तीत जास्त समाज बांधवांनी आपली माहिती पाठवावी व हा संदेश महाराष्ट्रभर शेअर करावा.* धन्यवाद. श्री. बबनराव करडे नायब तहसीलदार संस्थेचे सल्लागार श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts