**🌸 होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे 🌸** *(ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था)* संस्थापक अध्यक्ष **मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे** यांच्या दूरदृष्टीतून व समाजहिताच्या तळमळीने सुरू झालेली **होलर समाज सामाजिक संस्था** आज समाजासाठी एक आशेचा किरण ठरत आहे. कै. **भगवान हरिबा जावीर गुरुजी** *(समाज भूषण व होलार समाजाचे प्रेरणास्थान)* यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने अवघ्या **११ सदस्यांपासून सुरू झालेली ही संस्था** आज **७,००० पेक्षा अधिक सभासद नोंदणी** आणि संस्थेच्या वेबसाईटला **६२,००० पेक्षा अधिक भेटी** मिळवून समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करत आहे. ### 🌿 संस्थेचे विशेष ऐतिहासिक समाजहिताचे उपक्रम 🌿 🔹 **स्पर्धा परीक्षा अभियान** MPSC / UPSC गरजू विद्यार्थ्यांसाठी *मोफत मार्गदर्शन* 🔹 **महिला सशक्तिकरण अभियान** महिलांसाठी *सामाजिक, कायदेशीर व आर्थिक मोफत मार्गदर्शन* 🔹 **होलार समाज जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान** *मोफत सल्ला व मार्गदर्शन* 🔹 **युवक विकास अभियान** करिअर, कौशल्य विकास व *रोजगार मार्गदर्शन* 🔹 **सामाजिक व कायदेशीर सेवा अभियान** शासन योजना माहिती व *कायदेशीर सल्ला* 🔹 **आरोग्य सेवा अभियान** आरोग्य जनजागृती, तपासणी व *मोफत मार्गदर्शन* 🔹 **डिजिटल व माहिती सेवा अभियान** ऑनलाइन अर्ज व डिजिटल सेवा *मोफत मार्गदर्शन* या सर्व उपक्रमांमुळे समाजबांधव मोठ्या प्रमाणात **जागृत होत असून विविध योजनांचा लाभ घेत आहेत**. ### 🌺 संस्थेचे मार्गदर्शक व कार्यकर्ते 🌺 ▪️ **श्री. बबनराव करडे** – माजी नायब तहसीलदार, संस्थेचे सल्लागार ▪️ **श्री. अॅड. जी. एन. ऐवळे** – कायदे तज्ज्ञ, कायदे सल्लागार ▪️ **श्री. अर्जुन खांडेकर** – सचिव ▪️ **श्री. जगन्नाथ पारसे** – खजिनदार ▪️ **सौ. सारिका रूपेश हातेकर** – बँक मॅनेजर व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक ▪️ **शोभा मॅडम** – महिला अभियान मार्गदर्शक या सर्व मान्यवरांच्या सहकार्यामुळे मला समाजसेवेचे कार्य करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल **संस्थापक अध्यक्ष मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे** यांचे व संपूर्ण टीमचे **मनःपूर्वक अभिनंदन व आभार** 🙏 🌸 **होलर समाज सामाजिक संस्था – समाज परिवर्तनाचा विश्वासार्ह आधार!** 🌸 **धन्यवाद! जय भीम जय होलार
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-