होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे (आय.एस.ओ. 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था) महाराष्ट्रामधील पहिली आय.एस.ओ. मानांकन प्राप्त सामाजिक संस्था म्हणून आम्हाला अभिमान वाटतो. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे हे होलार समाजाच्या न्याय व हक्कासाठी अखंड लढा देत आहेत. समाज भूषण भगवान जावीर गुरुजी यांनी स्थापन केलेली संस्था त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या समाजासाठी, माझ्या लोकांसाठी कार्य करीत आहे. माझ्या घरातून आजवर साधा ग्रामपंचायत सदस्य देखील निवडून गेलेला नाही, तरीही संपूर्ण महाराष्ट्रातील होलार समाजाने संस्थेला मोठे केले,मला सन्मान दिला. तसेच भारत देशात व आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांमध्ये होलार समाजाची ओळख निर्माण झाली आहे.तसेच खऱ्या अर्थाने मा. सुहास गोळे सर आंतरराष्ट्रीय आय. एस.ओ. प्रमुख सल्लागार व मा. सुरेश माळी सर प्रमुख ऑडिटर आंतरराष्ट्रीय आय .एस.ओ. 9001-2015 यांचे मोठे योगदान संस्थेला लाभले आहे. होलार समाजाची ओळख निर्माण करण्यास सहकार्य केले आहे. हा समाज माझा परिवार आहे — आणि जर मी त्यांच्या न्यायासाठी, त्यांच्या अधिकारांसाठी लढलो नाही, तर पुढील पिढी मला कधीही माफ करणार नाही. आज महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांतून आमच्या लढ्याला आणि कार्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आपल्या सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन या चळवळीला बळ द्यावे — हाच आमचा मंनापासूनचा संदेश आहे. "ऐकजुटीतच आपला विकास — ऐकतेतच आपला सन्मान!" असे अहावाहन मा. बबनराव करंडे मा. नायब तहसीलदार तथा संस्थेचे मुख्य सल्लागार अँड. जी .एन. ऐवळे कायदे तज्ञ तथा संस्थेचे सल्लागार. मा. अर्जुन खांडेकर, मा. जगन्नाथ पारसे यांनी केले आहे.