प्रेस नोटीस / पत्रकार परिषद निमंत्रण विषय: होलार समाजाच्या विविध मागण्यांकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष – शासनाने मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन, अन्नत्याग उपोषणाचा इशारा. होलार समाज सामाजिक संस्था (ISO 9001:2015 प्रमाणित – आंतरराष्ट्रीय प्रामाणित संस्था) यांच्या वतीने समाजाच्या दीर्घकालीन मागण्यांबाबत राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात येत आहे. संस्थेला अलीकडेच ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र प्राप्त झाले असून, हे प्रमाणपत्र संस्थेच्या पारदर्शक, गुणवत्तापूर्ण व कार्यक्षम व्यवस्थापनाचे प्रतीक आहे. संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही उपलब्धी साध्य झाली आहे. महत्त्वाची माहिती: कार्यक्रम: पत्रकार परिषद व गौरव सोहळा आयोजक: होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे स्थळ: नवी पेठ, पुणे दिनांक: 28 ऑक्टोबर 2025 वेळ: दुपारी 11.00 ते 1.00 सर्व प्रतिनिधी, समाजबांधव व पत्रकार बंधू यांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमास सहकार्य करावे, ही विनंती. आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत! — आयोजक, होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे.