होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे आय. एस .ओ ..9001 2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था महाराष्ट्रामध्ये पहिली संस्था आहे. संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे स्पर्धा परीक्षा आणि मानसिक आरोग्य आज भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. पण हीच तरुण पिढी आज विद्यार्थीदशेत मानसिक दबाव, तणाव आणि असुरक्षिततेच्या जाळ्यात अडकलेली आहे. दरवर्षी भारतात तब्बल सहा कोटी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी आपले वर्चस्व पणाला लावतात नीट, जेईई, एमपीएसससी, यूपीएससी यास अन्य काही परीक्षा साठी दिवस रात्र कठोर मेहनत करतात. पण यश मिळणाऱ्यांचा टक्का आत्याल्प असतो. मेडिकल प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेतून 24 लाख परीक्षार्थीपैकी फक्त108 लाख विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो, जेईई परीक्षेतून बारा लाख विद्यार्थ्यांमधून फक्त 16 हजार जागा उपलब्ध होतात तर यूपीएससी च्या दहा लाख उमेदवारातून फक्त एक हजाराच्या आसपास उमेदवाराची निवड होते.99 टक्के विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षेतून अपयशाचा सामना करावा लागतो, हे कटू सत्य आहे स्पर्धा परीक्षेमध्ये अपयशासोबतच ताण, चिंता आणि मानसिक थकवा येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते मानसिक आरोग्य म्हणजे अशी स्थिती जिथे व्यक्ती स्वतःच्या क्षमता ओळखून तणावावर मात करते आणि समाजासाठी उपयोगी ठरते, पण भारतीय विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे चित्र वेगळं आहे. राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार 65०/० विद्यार्थ्यांना झोपेच्या समस्या आहेत,52०/० विद्यार्थी चिंतेत आहेत.45०/० विद्यार्थी निराश्यग्रस्त आहेत. तर 20०/० विद्यार्थ्यांना सातत्याने आत्महत्येचे विचार येतात. वर्ष 2013 ते 2022 दरम्यान विद्यार्थ्यांच्या आत्महत्या मध्ये तब्बल 64०/० वाढ झाली असून 2024 मध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या चा आकडा शेतकऱ्यांच्या आत्महत्या पेक्षाही जास्त होत आहे.
Popular Posts
-
-
होलार समाजासाठी विभागीय कार्यशाळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाली – छत्रपती संभाजीनगरात बार्टी व होलार समाज संस्थेचा उपक्रम छत्रपती संभाजीनगर, 10 जुलै 2025 – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती वस्ती सुधार योजना (बार्टी), पुणे व होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय विभागीय कार्यशाळेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले. ISO 9001:2015 प्रमाणित संस्थांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेचा मुख्य उद्देश जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र संदर्भातील अडचणी, बेरोजगारी, उद्योग धोरणे व युवा गट स्थापनेविषयी समाजाला योग्य मार्गदर्शन समाज कल्याण विभागाच्या विविध योजना होलार समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी सरकार, समाज, आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून समन्वय साधून विविध योजनेची अंमलबजावणी करणे हा कार्यशाळेचा उद्देश सामाजिक करणे हा होता. कार्यशाळेची सुरुवात थोर महापुरुषांच्या प्रतिमाचे मान्यवराच्या हस्ते पूजन करण्यात आले प्रमुख या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून बार्टी, पुणेचे अप्पर जिल्हाधिकारी व प्रशिक्षण विभाग प्रमुख, प्रकल्प व्यवस्थापक श्री. नितीन सहारे, सचिन नांदेडकर, संबंधित जिल्ह्यांचे उपविभागीय अधिकारी, कन्नड येथील प्रांत तहसीलदार, महसूल विभागाचे अधिकारी, जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य, समाजकल्याण विभागाचे अधिकारी, तसेच बार्टी संस्थेतील विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बार्टीचे श्री. नितीनजी सहारे सर यांनी सादर केले. त्यांनी प्रकल्पाच्या उद्देशांबाबत सविस्तर माहिती दिली. बार्टीच्या विविध योजना समजावून सांगितल्या उपविभागीय अधिकारी व तहसीलदार महसूल विभाग यांनी जात प्रमाणपत्र प्रक्रिया व येणाऱ्या अडचणींचे सखोल विश्लेषण केले. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेबाबत जिल्हा जात पडताळणी समिती, छत्रपती संभाजीनगर यांनी मार्गदर्शन केले. होलार समाजाचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे यांनी समाजाच्या प्रमुख अडचणी अधिकार्यांच्या समोर प्रभावीपणे मांडल्या. व होलार समाजाच्या विकासासाठी बार्टी पुणे मार्फत विशेषतः विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेतल्या जात इतिहास घडत आहे मा. सुनील वारे महासंचालक यांना व सर्व टीमचे समाज बांधवांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. अनेक समाजबांधवांनी देखील आपले प्रश्न प्रत्यक्षपणे मांडले. या संवादातून अनेक शंका दूर झाल्या व उपाययोजना सुचविण्यात आल्या. कार्यक्रमाचा समारोप व आभारप्रदर्शन श्री. नितीनजी सारे यांनी केले. या कार्यशाळेमुळे होलार समाजातील नागरिकांना प्रशासनाशी थेट संवाद साधता आला तसेच जात पडताळणी आणि रोजगाराच्या संधींबाबत मोलाचे मार्गदर्शन मिळाले सर्व कार्यक्रमाला उपस्थित समाज बांधव पदाधिकारी यांना संस्थेच्या वतीने धन्यवाद
-