दिनांक: २६ सप्टेंबर २०२५ स्थळ: औंध, पुणे होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे (ISO 9001:2015 प्रमाणित संस्था) या संस्थेच्या शिष्टमंडळाने आज मा. ओम प्रकाश बकोरिया, महासंचालक, महाऊर्जा विकास, महाराष्ट्र राज्य यांची औंध येथील मुख्य कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान मा. महासंचालक ओम प्रकाश बकोरिया साहेब यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध ऊर्जा संबंधित योजनांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये "कुसुम सोलर योजना" आणि "सूर्य घर मुक्त बिजली योजना" या प्रमुख योजनांचा समावेश होता. कुसुम सोलर योजना अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी सौरऊर्जेवर आधारित सिंचन पंप उपलब्ध करून दिले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोफत विजेचा लाभ मिळणार असून शेतीसाठी होणारा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. विशेषतः, उत्पादन खर्च वीज खर्चामुळे वाढत असताना ही योजना शाश्वत शेतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. या बैठकीस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. नामदेवराव श्रीरंग आयवळे, उपाध्यक्ष शोभा मॅडम, तसेच पदाधिकारी बाप्पू अहिवळे व सिताराम ऐवळे आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीत शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ समाजातील शेतकरी, ग्रामीण व गरजू घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेच्या वतीने सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले.
Featured Post
