होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे (ISO 9001:2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त संस्था) संस्थापक अध्यक्ष: श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे विशेष आवाहन सर्व छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व होलार समाजाच्या भगिनींना कळकळीचे निमंत्रण! आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी, बार्टी, पुणे यांच्या वतीने विशेषतः विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. इतिहासात नोंद दिनांक: 10 जुलै 2025 (गुरुवार) वेळ: सकाळी 10 ते सायं. 5 स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर कार्यशाळेचा विषय: होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक अडचणी आणि त्यावरील उपाय मार्गदर्शन करणारे अधिकारी: उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, महसूल विभाग जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती, छत्रपती संभाजीनगर सह आयुक्त, समाज कल्याण विभाग जिल्हा समाज कल्याण अधिकारी (जि. प.) गट विकास अधिकारी महत्त्वाचे मुद्दे: जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र प्रक्रियेतील अडचणी व उपाय समाजकल्याण विभाग व बार्टी अंतर्गत उपलब्ध योजना शैक्षणिक, आर्थिक मदत व मार्गदर्शन हा शिबीर फक्त दिखाऊपणा नसून, समाजाच्या उज्वल भविष्यासाठी एक प्रभावी पाऊल आहे. त्यामुळे सर्व भगिनींनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, ही विनंती. आपली उपस्थितीच आपल्या समाजाच्या उन्नतीचे द्योतक ठरेल! श्री. बबनराव करडे मा नायब तहसीलदार तथा संस्थेचे सल्लागार अँड. जी. एन .ऐवळे. कायदे तज्ञ तथा संस्थेचे कायदे सल्लागार. श्री. अर्जुन खांडेकर संस्थेचे सचिव. श्री. जगन्नाथ पारसे खजिनदार होलार समाज सामाजिक संस्था, पुणे