नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

होलार समाज सामाजिक संस्था – महत्त्वपूर्ण शिष्टमंडळ बैठक मुंबईत यशस्वीरित्या पार पडली दिनांक: 30 जुलै 2025, ठिकाण: संत रोहिदास चर्मोउद्योग व चर्मकार विकास महामंडळ, मुख्य कार्यालय, मुंबई होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त नोंदणीकृत संस्था असून, दिनांक 30 जुलै 2025 रोजी संस्थेचे शिष्टमंडळ श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे (संस्थापक अध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे महत्त्वपूर्ण मागण्यांसंदर्भात बैठक पार पडली. ही बैठक श्रीमती प्रेरणा देशभद्रतार (व्यवस्थापकीय संचालक, संत रोहिदास चर्मोउद्योग व चर्मकार विकास महामंडळ) यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, विभागीय अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सखोल चर्चा झाली. विशेषतः NSFDC योजनेंतर्गत धनादेशांसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांच्या प्रलंबित प्रकरणांबाबत, अनेकांनी पैसे भरूनही त्यांना लाभ मिळालेला नाही, तर काहींनी अर्ज करूनही मंजुरी मिळालेली नाही, याकडे संस्थेच्या शिष्टमंडळाने लक्ष वेधले. संस्थेच्या वतीने 2023 पासून अद्यापपर्यंत एकही प्रकरण मंजूर न झाल्याबाबतची आकडेवारी सादर करताना समाजात यामुळे नाराजी आहे, हे व्यवस्थापकीय संचालकांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश व्यवस्थापकीय संचालकांनी दिले असून, सर्व विभागीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात येणार असल्याचे त्यांनी आश्वस्त केले. या बैठकीत संस्थेचे खालील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते: श्री. बबनराव करडे (माजी नायब तहसीलदार, सल्लागार) श्री. बापू महादेव आयवळे (नेते) सौ. शोभा मॅडम (उपाध्यक्ष) श्री. जगन्नाथ पारसे (खजिनदार) श्री. अनिल गुळदगड (पुणे विभागीय अधिकारी) श्री. संजय कुमार जावीर (कार्याध्यक्ष, नवी मुंबई) श्री. सिताराम ऐवळे साहेब (जत) ही बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात आणि खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडली.

Featured Post

डॉ बाबासाहेब आंबेडकर बार्टी पुणे मार्फत अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील युवक - युवती करिता 1 महिना कालावधीचा अनिवासी निःशुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात 36 जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मा. सुनीलजी वारे सर महासंचालक, डॉ बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे यांच्या मान्यतेने श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था, पुणे यांच्या सातत्याने पाठपुरावा अथक प्रयत्नाने वरील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे याकरिता बार्टी पुणे वेबसाईटला भेट द्यावी तसेच प्रत्येक जिल्हा प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा किंवा होलार समाज सामाजिक संस्था पुणे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव आयवळे यांच्याशी संपर्क साधा मो. 9764969074

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts