होलार समाजासाठी विशेष विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा – बार्टी, पुणे मार्फत आयोजित दिनांक: 10 जुलै 2025 स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर वेळ: सकाळी 10:00 ते. 5 वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने होलार समाजातील बांधवांसाठी एक दिवसीय विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेचा उद्देश समाजातील युवक-युवती, विद्यार्थी, पदवीधर, बेरोजगार व इतर घटकांना शिक्षण, रोजगार, मार्गदर्शन व सरकारी योजनांची माहिती देणे हा आहे. कार्यशाळेची माहिती समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष दौरा श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे – संस्थापक अध्यक्ष, होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे ISO 9001: 2015 प्रामाणित मानांकन प्राप्त संस्थेचे शिष्टमंडळ दिनांक 6 जुलै 2025 रोजी खालील जिल्ह्यांचा दौरा करणार आहे: छत्रपती संभाजीनगर, जालना ,परभणी, हिंगोली या दौऱ्यात ते प्रत्यक्ष समाज बांधवांना भेटून, कार्यशाळेची सविस्तर माहिती देतील, तसेच उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहित करतील. आपले सहकार्य आवश्यक सर्व समाज बांधवांनी या कार्यशाळेत उपस्थित राहून शिक्षण व प्रगतीचे नवे क्षितिज गाठण्यासाठी ही संधी सोडू नये. विविध योजनांची माहिती, नोंदणी प्रक्रिया, करिअर मार्गदर्शन, स्कॉलरशिप्स, व रोजगार संधींचे सत्रे या कार्यशाळेत घेण्यात येणार आहेत. संपर्क 9764969074
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-