होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे( IS0 9001:2015 आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त संस्था) या संस्थेने केलेला ससातत्याने पाठपुरावा महाराष्ट्रातील होलार समाजाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावे असे काही उपक्रम राबवत आहेत. मा. सुनीलजी वारे सर महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे यांच्या मान्यतेने श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या आर्थक प्रयत्नाने श्री. बबनराव करडे मा नायब तहसीलदार सातारा व संस्थेचे सल्लागार यांच्या मार्गदर्शनाने सौ. शोभा मॅडम उपाध्यक्ष यांच्या सहकार्याने होलार समाजाच्या विकासासाठी बार्टी पुणे मार्फत विशेषतः विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेतल्या जात आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाज बांधवांना लाभ होताना दिसत आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील होलार समाजासाठी विविध शासकीय योजनेची एकदिवसीय विभागीय कार्यशाळा जाहीर होलार समाजाचा सामाजिक ,आर्थिक व सर्वागीण विकास व्हावा, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, जातीचे दाखले जात पडताळणी प्रमाणपत्रे काढताना येणाऱ्या विविध अडचणी बाबत सखोल मार्गदर्शन करण्यासाठी एक दिवशीय विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक 10 जुलै 2025 रोजी सकाळी 09:30 ते 05: या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर,जि . छत्रपती संभाजी नगर- 431001 येथे संपन्न होणार आहे तरी होलार समाजातील सर्व कार्यकर्ते, शिष्टमंडळ, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, विद्यार्थिना समाज बांधवांनी होलार समाजाच्या इतर संघटनांनी कार्यक्रमाला वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे ही नम्र विनंती. असे आवाहन अँड जि.एन.ऐवळे साहेब कायदे तज्ञ. संस्थेचे सल्लागार श्री अर्जुन खांडेकर संस्थेचे सचिव श्री जगन्नाथ पारसे खजिनदार
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-