नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

7 वर्षात महाराष्ट्रात नं. रिझल्ट देणारी एकमेव संस्था होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे IS0 9001: 2015 आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त संस्था समाज बांधवांचे अवघड विषय पण सोपे करून सोडविण्यात महाराष्ट्रात सर्व उत्कृष्ट संस्था या संस्थेन महाराष्ट्र शासनाच्या सातत्याने निदर्शनात आणून देण्यात आलेले विषय- व सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे मिळालेली यश. होलार समाज आजही अनेक मूलभूत सुविधा, शैक्षणिक व आर्थिक संधींपासून वंचित आहे. समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्या निदर्शनास आणून देत आहोत: जात प्रमाणपत्राबाबत अडचणी: अनेक होलार समाजातील लोकांना अद्यापही जात प्रमाणपत्र मिळालेले नाही. जात प्रमाणपत्राशिवाय त्यांना शैक्षणिक आरक्षण, नोकरीतील आरक्षण, शिष्यवृत्ती आणि इतर योजनांचा लाभ घेता येत नाही. शैक्षणिक मागासलेपणा: समाजातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती अत्यंत मर्यादित आहे. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट राहते. शाळांमध्ये पोषण आहार, मोफत पुस्तके, मार्गदर्शन शिबिरे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अशी धोरणात्मक मदत गरजेची आहे. आर्थिक दुर्बलता: समाजातील अनेक कुटुंबे आजही हातमजुरी व असंघटित क्षेत्रांवर अवलंबून आहेत. त्यामुळे स्वयंरोजगार व व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे सुरू करून समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे. सामाजिक सन्मान व आत्मसन्मान: अनेक ग्रामीण भागांमध्ये होलार समाज अजूनही सामाजिक भेदभावाला सामोरं जात आहे. समाजात जनजागृती, कायदेशीर संरक्षण व सामाजिक समतेसाठी विशेष मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. मागण्या: होलार समाजाच्या जातीचे प्रमाणपत्र त्वरीत व सुलभपणे मिळावे यासाठी विशेष शिबिरे व मार्गदर्शन व्यवस्था सुरू करावी. समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी विशेष आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा विस्तार करावा. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, शिष्यवृत्ती योजना व कोचिंग सुविधा वाढवाव्यात. सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणा लक्षात घेऊन विशेष धोरणात्मक निर्णय घेण्यात यावेत. म्हणजे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील वंचित होलार समाजाच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक सांस्कृतिक अडचणी व जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी आवश्यक उपाय योजना जसे की होलार समाजाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी मा. सुनीलजी वारे सर महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे मार्फत काही महत्त्वाची पावले उचललेली आहेत. महाराष्ट्रातील होलार समाजाकरीता विशेषतः विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेतल्या जात आहेत. जसे की होलार समाजाच्या विकासासाठी कार्यशाळा घेऊन त्यामध्ये युवकांना उद्योजकता प्रशिक्षण, समाजकल्याण मार्फत राबवित असलेल्या विविध योजना जात प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत मार्गदर्शनासह बार्टी संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण, यूपीएससी, एमपीएससी, आयबीपीएस जेईई निट, इत्यादी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, आधीछत्रवृत्ती उपक्रमाबाबतही, माहिती देण्यात येत आहे, जेणेकरून होलार समाजातील नागरिकांना त्याचा फायदा होईल.

Featured Post

**होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे** *ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था* **संस्थापक अध्यक्ष :** मा. श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे --- ## जाहीर सूचना होलार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने मौजे कमलापूर, ता. सांगोला, जि. सोलापूर येथे उभारण्यात येणाऱ्या **“होलार समाज बहुउद्देशीय हॉल”** या महत्त्वाकांक्षी वास्तूच्या **भूमिपूजन व पायाभरणी समारंभाचे** आयोजन मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात येणार आहे. मान्यवरांच्या शुभहस्ते या वास्तूचे भूमिपूजन करून समाजासाठी भव्य इमारत उभी करण्याच्या दिशेने एक नवे पाऊल टाकण्यात येणार आहे. उद्घाटन समारंभाची अंतिम तारीख मान्यवरांच्या उपलब्ध वेळेनुसार लवकरच जाहीर करण्यात येईल. --- ## संस्थेचा उद्देश समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी या बहुउद्देशीय हॉलच्या माध्यमातून पुढील उपक्रम राबविण्याचा संस्थेचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे : * प्रशिक्षण केंद्र * स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन * संगणक व कौशल्य विकास प्रशिक्षण * महिला प्रशिक्षण केंद्र * सांस्कृतिक भवन * सभा व लग्न समारंभ सुविधा * बालवाडी व अभ्यासिका * योगा केंद्र * पोलीस व मिलिटरी भरती प्रशिक्षण * SET/NET, JEE/NEET इत्यादी परीक्षांसाठी मार्गदर्शन --- समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी उभारण्यात येणाऱ्या या उपक्रमास सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून सहकार्य करावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती. --- **संस्थेचे सल्लागार** मा. श्री बबनराव करडे (नायब तहसीलदार) **संस्थेचे सचिव** श्री अर्जुन खांडेकर **संस्थेचे खजिनदार** श्री जगन्नाथ पारसे

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts