होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे नोंदणीकृत IS0 9001: 2015 आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त संस्था इतिहासामध्ये प्रथमच विशेषत:विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेतल्या जात आहे.– होलार समाजासाठी मार्गदर्शन आयोजक: होलार समाज सामाजिक संस्था सहकार्य: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI), पुणे दिनांक: 10 जुलै 2025 (बुधवार) वेळ: सकाळी 9:30 ते सायं. 5:00 ठिकाण: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा – 431001 कार्यशाळेचे उद्दिष्ट: छत्रपती संभाजीनगर विभागातील वंचित होलार समाज बांधव विविध अडचणीचा सामना करत आहे या संदर्भात मार्गदर्शन कार्यशाळेतील प्रमुख विषय: जसे की. विविध अडचणीचा संदर्भात मार्गदर्शन व प्रक्रिया. होलार समाज आजही अनेक मूलभूत सुविधा, शैक्षणिक व आर्थिक संधींपासून वंचित आहे. समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्या निदर्शनास आणून देत आहोत: जात प्रमाणपत्राबाबत अडचणी: अनेक होलार समाजातील लोकांना अद्यापही जात प्रमाणपत्र मिळालेले नाही. जात प्रमाणपत्राशिवाय त्यांना शैक्षणिक आरक्षण, नोकरीतील आरक्षण, शिष्यवृत्ती आणि इतर योजनांचा लाभ घेता येत नाही. शैक्षणिक मागासलेपणा: समाजातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती अत्यंत मर्यादित आहे. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट राहते. शाळांमध्ये पोषण आहार, मोफत पुस्तके, मार्गदर्शन शिबिरे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अशी धोरणात्मक मदत गरजेची आहे. आर्थिक दुर्बलता:समाजातील अनेक कुटुंबे आजही हातमजुरी व असंघटित क्षेत्रांवर अवलंबून आहेत. त्यामुळे स्वयंरोजगार व व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे सुरू करून समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे. सामाजिक सन्मान व आत्मसन्मान: अनेक ग्रामीण भागांमध्ये होलार समाज अजूनही सामाजिक भेदभावाला सामोरा जात आहे. समाजात जनजागृती, कायदेशीर संरक्षण व सामाजिक समतेसाठी विशेष मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. होलार समाजाच्या जातीचे प्रमाणपत्र त्वरीत व सुलभपणे मिळावे यासाठी विशेष शिबिरे व मार्गदर्शन व्यवस्था सुरू करण्यात आले आहेत. मा. सुनीलजी वारे सर महासंचालक, डॉ बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे यांचे मनापासून अभिनंदन. आपली उपस्थिती आम्हाला प्रेरणा देईल व समाजासाठी पुढील दिशा ठरवेल आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती असे आवाहन वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे श्री बबनराव करडे साहेब नायब तहसीलदार तथा संस्थेचे सल्लागार अँड जि.एन.ऐवळे कायदे तज्ञ तथा संस्थेचे कायदेविषयक सल्लागार श्री .अर्जुन खांडेकर सचिव श्री. जगन्नाथ पारसे खजिनदार
Popular Posts
-
-
होलार समाजासाठी विभागीय कार्यशाळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाली – छत्रपती संभाजीनगरात बार्टी व होलार समाज संस्थेचा उपक्रम छत्रपती संभाजीनगर, 10 जुलै 2025 – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती वस्ती सुधार योजना (बार्टी), पुणे व होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय विभागीय कार्यशाळेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले. ISO 9001:2015 प्रमाणित संस्थांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेचा मुख्य उद्देश जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र संदर्भातील अडचणी, बेरोजगारी, उद्योग धोरणे व युवा गट स्थापनेविषयी समाजाला योग्य मार्गदर्शन समाज कल्याण विभागाच्या विविध योजना होलार समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी सरकार, समाज, आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून समन्वय साधून विविध योजनेची अंमलबजावणी करणे हा कार्यशाळेचा उद्देश सामाजिक करणे हा होता. कार्यशाळेची सुरुवात थोर महापुरुषांच्या प्रतिमाचे मान्यवराच्या हस्ते पूजन करण्यात आले प्रमुख या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून बार्टी, पुणेचे अप्पर जिल्हाधिकारी व प्रशिक्षण विभाग प्रमुख, प्रकल्प व्यवस्थापक श्री. नितीन सहारे, सचिन नांदेडकर, संबंधित जिल्ह्यांचे उपविभागीय अधिकारी, कन्नड येथील प्रांत तहसीलदार, महसूल विभागाचे अधिकारी, जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य, समाजकल्याण विभागाचे अधिकारी, तसेच बार्टी संस्थेतील विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बार्टीचे श्री. नितीनजी सहारे सर यांनी सादर केले. त्यांनी प्रकल्पाच्या उद्देशांबाबत सविस्तर माहिती दिली. बार्टीच्या विविध योजना समजावून सांगितल्या उपविभागीय अधिकारी व तहसीलदार महसूल विभाग यांनी जात प्रमाणपत्र प्रक्रिया व येणाऱ्या अडचणींचे सखोल विश्लेषण केले. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेबाबत जिल्हा जात पडताळणी समिती, छत्रपती संभाजीनगर यांनी मार्गदर्शन केले. होलार समाजाचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे यांनी समाजाच्या प्रमुख अडचणी अधिकार्यांच्या समोर प्रभावीपणे मांडल्या. व होलार समाजाच्या विकासासाठी बार्टी पुणे मार्फत विशेषतः विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेतल्या जात इतिहास घडत आहे मा. सुनील वारे महासंचालक यांना व सर्व टीमचे समाज बांधवांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. अनेक समाजबांधवांनी देखील आपले प्रश्न प्रत्यक्षपणे मांडले. या संवादातून अनेक शंका दूर झाल्या व उपाययोजना सुचविण्यात आल्या. कार्यक्रमाचा समारोप व आभारप्रदर्शन श्री. नितीनजी सारे यांनी केले. या कार्यशाळेमुळे होलार समाजातील नागरिकांना प्रशासनाशी थेट संवाद साधता आला तसेच जात पडताळणी आणि रोजगाराच्या संधींबाबत मोलाचे मार्गदर्शन मिळाले सर्व कार्यक्रमाला उपस्थित समाज बांधव पदाधिकारी यांना संस्थेच्या वतीने धन्यवाद
-