नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

विभागीय कार्यशाळेची माहिती कार्यक्रमाचे उद्दिष्ट: छत्रपती संभाजीनगर विभागातील होलार समाजातील अनुसूचित जातीच्या घटकांना जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन व सहाय्य देणे. आयोजक: श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष, होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, IS0 9001: 2015 आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त संस्था त्यांच्या अथक प्रयत्नातून आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान व प्रशिक्षण संस्था (BARC / BARTI), पुणे यांच्या माध्यमातून ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. कार्यशाळेचे ठिकाण: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा जि. छत्रपती संभाजी नगर-431001 येथे दिनांक 10 जुलै 2025 रोजी व वेळ: सकाळी 09:30 ते 05:00 या वेळेत कार्यशाळेचा हेतू: जात प्रमाणपत्र / जात पडताळणी प्रक्रियेसंबंधी सखोल मार्गदर्शन आवश्यक कागदपत्रांची माहिती अर्ज करताना होणाऱ्या त्रुटी आणि त्यावरील उपाय कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रियेतील अडथळ्यांवर उपाययोजना BARTI मार्फत उपलब्ध असणाऱ्या योजना व मदत अधिक माहितीसाठी संपर्क करा: होलार समाज सामाजिक संस्था, गणपत नगर बिबवेवाडी पुणे 37 (संपर्क क्रमांक, 9764969074 वेबसाईटला भेट द्या सूचना: सदर कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी संस्थेच्या प्रतिनिधींशी संपर्क साधा. बबनराव करडे नायब तहसीलदार सातारा संस्थेचे सल्लागार. सातारा अँड जि.एन. ऐवळे पुणे. जगन्नाथ पारसे खजिनदार सांगोला.

Featured Post

निःशुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम – बार्टी पुणे आयोजक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे सहकार्याने: श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, संस्थापक अध्यक्ष – होलार समाज सामाजिक संस्था, पुणे कार्यक्रमाचे स्वरूप: कालावधी: 1 महिना (अनिवासी) फी: पूर्णतः मोफत (निःशुल्क) ठिकाण: महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण जिल्हा निहाय एक दिवसीय परिचय मेळावा आयोजित प्रशिक्षणाचे उद्दिष्ट: अनुसूचित जातीतील युवक-युवतींना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक त्या सर्व कौशल्यांचे प्रशिक्षण देणे. प्रशिक्षणातील प्रमुख विषय: उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास कारखाना भेटी उद्योगासाठी नोंदणी व परवाने स्टार्टअप इंडिया / स्टँडअप इंडिया मुद्रा योजना / मेक इन इंडिया यशस्वी उद्योजकांशी चर्चा उद्योग निवड व उभारणी प्रक्रिया बाजारपेठेचे सर्वेक्षण महिला उद्योजकांसाठी धोरण प्रकल्प अहवाल तयार करणे निधी उभारणीचे मार्ग कर्ज योजना / महामंडळांच्या योजना कंपनी नोंदणी व प्रक्रिया विक्री व व्यवस्थापन कौशल्य अभिप्रेरणा प्रशिक्षण विविध क्षेत्रातील उद्योग संधी (कृषी, खाद्य, केमिकल, प्लास्टिक इ.) आवश्यक कागदपत्रे (प्रत्येकी 2 झेरॉक्स): जातीचा दाखला आधार कार्ड शाळा सोडल्याचा दाखला / मार्कलिस्ट पॅनकार्ड 2 पासपोर्ट साईज फोटो पात्रता निकष: जात: अनुसूचित जाती (SC) वय: 18 ते 45 वर्ष शिक्षण: किमान 8वी पास महाराष्ट्रातील रहिवासी: किमान 15 वर्षे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असावी कोणत्याही बँकेचा/संस्थेचा डिफॉल्टर नसावा (क्रेडिट स्कोअर चांगला असावा) महिलांना प्राधान्य अर्ज व माहिती कशी मिळवावी: बार्टी पुणे वेबसाइटला भेट द्या: https://barti.maharashtra.gov.in जिल्हा प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क करा किंवा संपर्क साधा: श्री. नामदेवराव आयवळे मो. 97649 69074 (होलार समाज सामाजिक संस्था, पुणे) निवड प्रक्रिया: जिल्हा निहाय मेळावा होईल अर्ज व कागदपत्रांची तपासणी मुलाखतीच्या आधारे निवड

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts