नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे lS0 9001-2015 आंतरराष्ट्रीय प्रमाणित संस्था. पत्ता. सर्वे नंबर 634/अ, गणपत नगर, बिबवेवाडी ,पुणे - 411037 ही संस्था दिनांक. 8.3.2019 रोजी स्थापन करण्यात आली ही संस्था होलार समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी काही महत्त्वपूर्ण योगदान देता यावे या हेतूने 2019ला स्थापना करण्यात आली नामदेवराव आयवळे समाज भूषण कै.भगवान जावीर गुरुजी बबनराव करडे नायब तहसीलदार सातारा संस्थेचे मुख्य सल्लागार तसेच कायदेतज्ञ जि.एन . ऐवळे सल्लागार यांनी त्यांच्या काही सहकार्याच्या मदतीने 11 सदरसस्याने स्थापन केलेली संस्था आज 5 हजारापेक्षा अधिक सभासद नोंदणी करून सहभागी झाले आहेत. सभासद नोंदणी चालू आहे. होलार समाज सामाजिक संस्थेची स्वतंत्र वेबसाईट चालू आहे संस्थेच्या वेबसाईटला 55 हजारा पेक्षा जास्त लोकांनी भेट दिली आहे त्या जोरावर दिनांक.19.5.2025 ला होलार समाज सामाजिक संस्थेला IS0 9001-2015 आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. तसेच होलार समाज सामाजिक संस्था सर्व मार्गदर्शक संस्थांना व हितचिंतकांना अत्यंत नम्रपणाने हे सांगू इच्छिते की ह्या प्रमाणपत्राच्या प्राप्तीमुळे होलार समाजबांधवांच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध होऊन दृढनिश्चयाने अधिकाधिक कार्य आपल्या मार्गदर्शनाखाली करण्याची प्रेरणा संस्थेला मिळाली आहे. संस्थेला आपले साह्य व मार्गदर्शन भविष्यातही मिळत राहो ही प्रार्थना संस्था करत आहे. आपला विश्वासू श्री नामदेवराव श्रीरंग आवळे संस्थापक अध्यक्ष गोल्हार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य,पुणे

Featured Post

**होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे** *ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था* **संस्थापक अध्यक्ष :** मा. श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे --- ## जाहीर सूचना होलार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने मौजे कमलापूर, ता. सांगोला, जि. सोलापूर येथे उभारण्यात येणाऱ्या **“होलार समाज बहुउद्देशीय हॉल”** या महत्त्वाकांक्षी वास्तूच्या **भूमिपूजन व पायाभरणी समारंभाचे** आयोजन मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात येणार आहे. मान्यवरांच्या शुभहस्ते या वास्तूचे भूमिपूजन करून समाजासाठी भव्य इमारत उभी करण्याच्या दिशेने एक नवे पाऊल टाकण्यात येणार आहे. उद्घाटन समारंभाची अंतिम तारीख मान्यवरांच्या उपलब्ध वेळेनुसार लवकरच जाहीर करण्यात येईल. --- ## संस्थेचा उद्देश समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी या बहुउद्देशीय हॉलच्या माध्यमातून पुढील उपक्रम राबविण्याचा संस्थेचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे : * प्रशिक्षण केंद्र * स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन * संगणक व कौशल्य विकास प्रशिक्षण * महिला प्रशिक्षण केंद्र * सांस्कृतिक भवन * सभा व लग्न समारंभ सुविधा * बालवाडी व अभ्यासिका * योगा केंद्र * पोलीस व मिलिटरी भरती प्रशिक्षण * SET/NET, JEE/NEET इत्यादी परीक्षांसाठी मार्गदर्शन --- समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी उभारण्यात येणाऱ्या या उपक्रमास सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून सहकार्य करावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती. --- **संस्थेचे सल्लागार** मा. श्री बबनराव करडे (नायब तहसीलदार) **संस्थेचे सचिव** श्री अर्जुन खांडेकर **संस्थेचे खजिनदार** श्री जगन्नाथ पारसे

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts