अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांसाठी शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू सांगली, दि. 21 (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सांगली जिल्या समध्ये अनुसूचित व नवबौद्ध मुलां/मुलींच्या 200 क्षमता असणाऱ्या 06 शासकीय निवासी शाळा, शासकीय इमारतीमध्ये कार्यरत आहेत. या निवासी शाळांमध्ये इयत्ता 6 वी ते 10 वी सेमी इंग्रजी माध्यम या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेश अर्ज शासकीय निवासी शाळा व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सांगली येथे उपलब्ध असल्याचे समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. या शासकीय निवासी शाळांमध्ये विद्यार्थी/विद्यार्थिनींना कोणतीही फी न घेता मोफत प्रवेश दिला जातो. सुसज्ज शासकीय इमारतीत निवास, निवास साहित्य, भोजन, दैनंदिन वापराचे साहित्य, पाठ्यपुस्तके, वह्या, इतर शैक्षणिक साहित्य व गणवेश अशा प्रकारच्या सुविधा मोफत दिल्या जातात. विद्यार्थी/ विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाकरिता सुसज्ज अद्यावत वर्ग खोल्या, ग्रंथालय, व्यायामशाळा, ई-लर्निंग, मनोरंजन कक्ष, ई-लायब्ररी इत्यादी सोयीसुविधेसह विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. प्रवेशासाठी प्रवर्गनिहाय जागा आरक्षित व मर्यादित असून अनुसूचित जाती व नवबौद्ध 80 टक्के, अनुसूचित जमाती 10 टक्के, विजाभज 5 टक्के, दिव्यांग 3 टक्के, एस.बी.सी. 2 टक्के याप्रमाणे शासकीय निवासी शाळेत प्रवेश निश्चित केला जातो. प्रवेशासाठी शाळेचे मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा. निवासी शाळेचे नाव व कंसात मुख्याध्यापकांचे नाव व मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे. मुलांची शासकीय निवासी शाळा, कवठेएकंद ता. तासगांव (पी. सी. भातलंवडे, मो.क्र. 9284801040), मुलांची शासकीय निवासी शाळा, विटा ता. खानापुर (प्रितम भोसले, मो.क्र. 7028010118), मुलांची शासकीय निवासी शाळा, कवठेमहांकाळ ता. कवठेमहांकाळ (देवानंद धवसे, मो. क्र. 9420836631, मुलांची शासकीय निवासी, वांगी ता. कडेगांव (एस. एच. भेासले, मो. क्र. 8698029878), मुलींची शासकीय निवासी, बांबवडे ता. पलूस (तानाजी करचे, मो. क्र. 9766040998), मुलींची शासकीय निवासी शाळा, जत ता. जत (डी. डी. जाधव, मो.क्र. 8275207276) 00000
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-