नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांसाठी शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू सांगली, दि. 21 (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सांगली जिल्या समध्ये अनुसूचित व नवबौद्ध मुलां/मुलींच्या 200 क्षमता असणाऱ्या 06 शासकीय निवासी शाळा, शासकीय इमारतीमध्ये कार्यरत आहेत. या निवासी शाळांमध्ये इयत्ता 6 वी ते 10 वी सेमी इंग्रजी माध्यम या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेश अर्ज शासकीय निवासी शाळा व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सांगली येथे उपलब्ध असल्याचे समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. या शासकीय निवासी शाळांमध्ये विद्यार्थी/विद्यार्थिनींना कोणतीही फी न घेता मोफत प्रवेश दिला जातो. सुसज्ज शासकीय इमारतीत निवास, निवास साहित्य, भोजन, दैनंदिन वापराचे साहित्य, पाठ्यपुस्तके, वह्या, इतर शैक्षणिक साहित्य व गणवेश अशा प्रकारच्या सुविधा मोफत दिल्या जातात. विद्यार्थी/ विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाकरिता सुसज्ज अद्यावत वर्ग खोल्या, ग्रंथालय, व्यायामशाळा, ई-लर्निंग, मनोरंजन कक्ष, ई-लायब्ररी इत्यादी सोयीसुविधेसह विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. प्रवेशासाठी प्रवर्गनिहाय जागा आरक्षित व मर्यादित असून अनुसूचित जाती व नवबौद्ध 80 टक्के, अनुसूचित जमाती 10 टक्के, विजाभज 5 टक्के, दिव्यांग 3 टक्के, एस.बी.सी. 2 टक्के याप्रमाणे शासकीय निवासी शाळेत प्रवेश निश्चित केला जातो. प्रवेशासाठी शाळेचे मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा. निवासी शाळेचे नाव व कंसात मुख्याध्यापकांचे नाव व मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे. मुलांची शासकीय निवासी शाळा, कवठेएकंद ता. तासगांव (पी. सी. भातलंवडे, मो.क्र. 9284801040), मुलांची शासकीय निवासी शाळा, विटा ता. खानापुर (प्रितम भोसले, मो.क्र. 7028010118), मुलांची शासकीय निवासी शाळा, कवठेमहांकाळ ता. कवठेमहांकाळ (देवानंद धवसे, मो. क्र. 9420836631, मुलांची शासकीय निवासी, वांगी ता. कडेगांव (एस. एच. भेासले, मो. क्र. 8698029878), मुलींची शासकीय निवासी, बांबवडे ता. पलूस (तानाजी करचे, मो. क्र. 9766040998), मुलींची शासकीय निवासी शाळा, जत ता. जत (डी. डी. जाधव, मो.क्र. 8275207276) 00000

Featured Post

होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे (नोंदणीकृत संस्था | ISO 9001:2015 प्रमाणित) संस्थापक अध्यक्ष: आदरणीय श्री. नामदेवराव आयवळे समाज बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपली अडचण... आमची जबाबदारी! होलार समाज सामाजिक संस्था ही एक विनामूल्य सेवा देणारी प्रामाणिक संस्था आहे. संस्थेच्या माध्यमातून समाज बांधवांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक त्या सर्व मार्गदर्शनाची मोफत सेवा दिली जाते. संस्थेचे शिष्टमंडळ सातत्याने शासन दरबारी समाजाच्या प्रश्नांवर ठोस पाठपुरावा करत आहे. सामाजिक न्यायासाठी पुढाकार! महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील घटक होलार समाज अजूनही अनेक अडचणींमुळे सामाजिक व शैक्षणिक प्रगतीपासून वंचित आहे. त्यामध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे – ५० वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक पुरावा उपलब्ध न होणे, ज्यामुळे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळवणे कठीण जाते. विद्यार्थ्यांसाठी विशेष आवाहन ज्यांना जात प्रमाणपत्र अथवा जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही आणि त्यामुळे शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया किंवा शिष्यवृत्ती, नोकरी यामध्ये अडचणी येत आहेत, त्यांनी तात्काळ संस्थेशी संपर्क साधावा. संस्था काय करते? मोफत मार्गदर्शन आवश्यक कागदपत्रांची माहिती अर्ज भरताना सहाय्य पुरावे मिळवण्यासाठी सहकार्य शासन दरबारी योग्य पाठपुरावा संपर्क करा –7972140451 होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे "हक्कांची जाणीव... विकासाची दिशा!" होलार समाजासाठी, प्रामाणिकपणे आणि निष्कलंक सेवेसाठी कटिबद्ध.

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts