नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

📃 *10 वी व 12 वी विद्यार्थ्यांसाठी लागणारे; महत्वाचे शासकीय दाखले आणि दाखल्यांसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे...!* 🎯 *लेट्स न्यूज : विश्वास महाराष्ट्राचा* ━━━━━━━━━━━━━ 💁🏻♀️ काही दिवसाआधी १२ वीचा निकाल लागला तसेच काही दिवसानंतर १० चा बोर्ड निकाल लागेल. आपली कागदपत्रे काढण्यासाठी धावपळ सुरू होईल. ती धावपळ होऊ नये म्हणून आपण आजच आपली शासकीय दाखले काढून घ्या म्हणजे ऐनवेळी आपली धावपळ होणार नाही. 🛑 *महत्वाचे शासकीय दाखले* ✅ उत्पन्नाचा दाखला ✅ डोमासाईल (वय व अधिवास) दाखला ✅ नॅशनॅलिटी (वय व राष्ट्रीयत्व) दाखला ✅ जातीचा दाखला ✅ डोंगरी दाखला ✅ नॉनक्रिमीलेअर दाखला ✅ अल्पभूधारक / शेतकरी असल्याचा दाखला ✅ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा दाखला 🛑 *दाखल्यांसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे* ♦️ *उत्पन्नाचा दाखला* ✅ तलाठी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला ✅ रेशनकार्ड ✅ आधार कार्ड ✅ उत्पन्न नोकरी पासून असल्यास फॉर्म नंबर 16 (आयटी रिटर्न्स) ♦️ *डोमासाईल (वय व अधिवास) दाखला* ✅ शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड (जन्मतारीख व जन्मस्थळ नमूद असणे आवश्यक) ✅ रेशनकार्ड ✅ रहिवाशी दाखला (तलाठी / सरपंच) ✅ आधारकार्ड ♦️ *नॅशनॅलिटी (वय व राष्ट्रीयत्व) दाखला* ✅ डोमासाईल ✅ शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड ( जन्मतारीख व जन्मस्थळ नमूद असणे आवश्यक) ✅ रेशनकार्ड ✅ आधारकार्ड ♦️ *जातीचा दाखला* ✅ स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड ✅ वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला ✅ आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला ( पुरावा - SC/ST १९५० पूर्वीचा, OBC - १९६७ पूर्वीचा, NT/ SBC - १९६१ पूर्वीचा) ✅ आवश्यक असल्यास ७/१२ उतारे ✅ आवश्यक असल्यास फेरफार ♦️ *डोंगरी दाखला* ✅ प्राथमिक शाळेचा रजिस्टर 1 चा उतारा ✅ तलाठी रहिवाशी दाखला ✅ रेशनकार्ड ✅ आधार कार्ड ♦️ *नॉनक्रिमीलेअर दाखला* ✅ शाळा सोडल्याचा दाखला ✅ जातीचा दाखला ✅ तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला ✅ रेशनकार्ड ♦️ *अल्पभूधारक / शेतकरी असल्याचा दाखला* ✅ मंडल अधिकारी अहवाल ( आमच्या कार्यालयात उपलब्ध) ✅ संबधित ७/१२ व ८ अ उतारे ✅ शाळा सोडल्याचा दाखला ✅ उत्पन्नाचा दाखला ✅ रेशनकार्ड ♦️ *आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा दाखला* ✅ स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला ✅ वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला ✅ आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला ✅ उत्पन्नाचा दाखला ✅ स्वयंघोषणापत्र (आमच्या कार्यालयात उपलब्ध) ✅ रेशनकार्ड 🙏🏻 *कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..* ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

Featured Post

# 📢 होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे *(ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था)* 👤 **संस्थापक अध्यक्ष : श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे** ## 🌟 संस्थेची प्रगती व पारदर्शकता अहवाल ✅ **संस्थेची स्थापना** * दिनांक : ८ मार्च २०१९ ✅ **एकूण सभासद संख्या** * आजअखेर : **११,३५३ सभासद** ✅ **ISO 9001:2015 मानांकन** * प्राप्त दिनांक : **९ मे २०२५** ✅ **राज्यव्यापी सभासद नोंदणी** * महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू ✅ **सभासद पात्रता** * संस्थेचे ध्येय, उद्देश व नियमावली मान्य असलेले * १८ वर्षांवरील कोणतेही भारतीय स्त्री किंवा पुरुष सभासद होऊ शकतात. ✅ **संस्थेची अधिकृत वेबसाईट** * आजअखेर वेबसाईटला **१,३८,२१६ भेटी** ✅ **मासिक वेबसाईट अहवाल** * प्रत्येक महिन्यात चार वेळा वेबसाईट भेटींची माहिती प्रसिद्ध केली जाईल. ✅ **संस्थेची १० समाजहित विकास अभियाने** * प्रत्येक महिन्यात लाभार्थ्यांची संख्या जाहीर केली जाईल. ## 🎯 संस्थेची भूमिका होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे ही संस्था **पारदर्शकता, प्रामाणिकपणा, उत्तरदायित्व आणि समाजहित** या तत्त्वांवर कार्यरत आहे. संस्थेच्या सर्व उपक्रमांची, सभासद संख्येची, अभियानांच्या प्रगतीची आणि समाजाला झालेल्या लाभाची माहिती नियमितपणे समाजबांधवांपर्यंत पोहोचविणे हे संस्थेचे कर्तव्य मानले जाते. समाजाचा विश्वास, सहभाग आणि सहकार्य यामुळेच संस्थेची वाटचाल अधिक बळकट होत आहे. **आपला विश्वास — आमची जबाबदारी** **आपला सहभाग — समाजाच्या प्रगतीची ताकद** — **होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे**

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts