नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

# *पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजना याअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.* *2 गाई किंवा 2 म्हशी 100 कोंबडी* *अर्जदारांसाठी योजनेंतर्गत अर्ज करण्याची मुदत दि.03.05.2025 ते 02.06.2025 पर्यंत राहील.* *अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे.* १) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य) २) * सातबारा (अनिवार्य) ३) * ८ अ उतारा (अनिवार्य) ४) * अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र ५) आधारकार्ड (अनिवार्य ) ६) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य) ७) * अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य) ८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य ) ९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य) १०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य) ११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) ( असल्यास अनिवार्य) १२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य ) १३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत (१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत १५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला. १६) रोजगार, स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत १७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

Featured Post

🏛 *होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे* 🌍 *ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था* 👤 *संस्थापक अध्यक्ष* 🌹 *श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे* ━━━━━━━━━━━━━━━━━━ # 🏛 होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या १० समाजहित अभियानांना अभूतपूर्व प्रतिसाद – आजअखेर १,५६२ लाभार्थी, वेबसाईटला १,४०,०३० भेटी! समाजातील विद्यार्थी, युवक, महिला, पालक, ज्येष्ठ नागरिक आणि सर्व समाजबांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक कार्य करत आहे. संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या **१० समाजहित अभियानांना** समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून **आजअखेर १,५६२ लाभार्थींनी** विविध अभियानांचा लाभ घेतला आहे. 📊 **अभियाननिहाय लाभार्थी संख्या** 📚 अभियान क्र. १ – स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियान : **१५५** 👩‍🎓 अभियान क्र. २ – महिला सशक्तीकरण अभियान : **१६२** 📄 अभियान क्र. ३ – जात प्रमाणपत्र व जात पडताळणी मार्गदर्शन अभियान : **१९९** 🏪 अभियान क्र. ४ – स्वावलंबन, रोजगार, करिअर व कौशल्य विकास अभियान : **४०** 🚭 अभियान क्र. ५ – समाज भूषण कै. भगवान जावीर गुरुजी व्यसनमुक्ती अभियान : **१०८** 💖 अभियान क्र. ६ – सर्वधर्म समभाव वधू-वर सूचक अभियान : **१८३** 📑 अभियान क्र. ७ – महायोजना मार्गदर्शन अभियान : **२००** 🎯 अभियान क्र. ८ – करिअर, कौशल्य विकास, व्यक्तिमत्त्व विकास व मुलाखत तयारी अभियान : **१६०** 🩺 अभियान क्र. ९ – आरोग्य सेवा, जनजागृती व मोफत मार्गदर्शन अभियान : **२००** 🌟 अभियान क्र. १० – समाजहितासाठी शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक अभियान : **१६५** 🏆 **एकूण लाभार्थी : १,५६२** ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🌐 **संस्थेच्या वेबसाईटला आजअखेर १,४०,०३० भेटी प्राप्त झाल्या आहेत.** ही संख्या समाजाचा वाढता विश्वास, संस्थेच्या कार्याची पारदर्शकता आणि समाजहितासाठी सुरू असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची साक्ष देणारी आहे. 🙏 **सर्व समाजबांधवांना नम्र आवाहन** संस्थेच्या सर्व अभियानांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. हा संदेश प्रत्येक गावात, प्रत्येक कुटुंबात आणि प्रत्येक समाजबांधवापर्यंत पोहोचवावा. तळागाळातील गरजू व्यक्तींना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणे हेच संस्थेचे ध्येय आहे. आपल्या सहकार्यामुळे अधिकाधिक समाजबांधवांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, शासकीय योजना आणि सामाजिक प्रबोधनाचा लाभ मिळू शकतो. **"चला, समाजहितासाठी हातात हात घालून ज्ञान, जागृती आणि प्रगतीचा संदेश घराघरात पोहोचवूया."** 🌐 **वेबसाईट :** [https://holarsamajssp.blogspot.com/](https://holarsamajssp.blogspot.com/) ✨ **शिक्षण • संघटन • स्वाभिमान** ✨ ✊ **जय होलार समाज** ✊

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts