नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

https://holarsamajssp.blogspot.com/ https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/ मा.ना. श्रीमती माधुरीताईं मिसळ, राज्यमंत्री, सामाजिक न्याय विभाग मंत्रालय मुंबई मंत्रालय मुंबई येथे दिनांक. 29.0 4. 2025 रोजी होलार समाजाच्या विविध मागण्या संदर्भात होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे शिष्टमंडळ श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात मा. महोदय, माधुरीताई मिसाळ राज्यमंत्री मुंबई यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले जसे की संत रोहिदास चर्मोउद्योग व चर्मकार विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाचा उपक्रम एनएसएफडीसी मंजुरीसाठी प्रलंबित व मंजूर झालेले प्रकरण व मंजूर होऊन पण लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा न होणे महामंडळाच्या विविध जाचक अटी रद्द करणे. व संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातील वसुलीनिरीक्षक, कर्मचाऱ्यांचे मागील एक वर्षापासून थकीत प्रवास खर्च व कार्यालयीन खर्चाची बिले मिळालेली नाहीत अशा अनेक प्रश्न राज्यमंत्री यांच्या निदर्शनात आणून देण्यात आले त्यावेळी महोदयांनी होलार समाजाच्या विविध मागणीची घेतली दखल व तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या

Featured Post

भावपूर्ण श्रद्धांजली आदरणीय भगवान हरिबा जावीर (गुरुजी) (1 जून 1953 – 21 ऑगस्ट 2024) संस्थापक – "होलार समाज मानवता मंदिर", बोपोडी प्रेरणास्थान व मुख्य सल्लागार – "होलार समाज सामाजिक संस्था" होलार समाजाचे भिष्म पितामह, आदरणीय भगवान हरिबा जावीर (गुरुजी) यांचे 21 ऑगस्ट 2024 रोजी दुःखद निधन झाले. समाजाच्या उत्थानासाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या या थोर व्यक्तिमत्वाने मागे एक अपार सामाजिक कार्याचा वारसा सोडला आहे. मुळचे नाझरे, ता. सांगोला, जि. सोलापूर येथील असलेल्या गुरुजींनी 1976 मध्ये पुणे महानगरपालिका शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा सुरू केली. पण त्यांची खरी ओळख समाजासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याची होती. 1980 मध्ये "होलार समाज मानवता मंदिर" या महाराष्ट्रातील पहिल्या समाज मंदिराची स्थापना करून त्यांनी समाजजागृतीचा विडा उचलला. 1980 ते 1997 या काळात अंगणवाडी व बालवाडी चालवून समाजातील लहानग्यांसाठी शिक्षणाची दारे उघडली. त्यांनी व्यसनमुक्ती अभियान राबवले आणि असंख्य समाज बांधवांना नवजीवन दिले. त्यांच्या कार्याची दखल घेत 1985 साली पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने त्यांना "आदर्श शिक्षक पुरस्कार" बहाल केला. गुरुजींनी समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवून, अनेक बांधवांना न्याय मिळवून दिला. महाराष्ट्रभर फिरून त्यांनी होलार समाजाला एकत्र आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या कार्यामुळे समाजाला बंधुता, प्रेम, शिक्षण व समानतेचे मूल्य लाभले. त्यामुळेच संपूर्ण समाजाने त्यांना "भिष्म पितामह" आणि "समाजभूषण" अशा पदव्या बहाल केल्या. कुटुंबाकडे दुर्लक्ष करून आयुष्यभर समाजासाठी अर्पण करणाऱ्या या थोर व्यक्तीचे योगदान कधीच विसरता येणार नाही. त्यांच्या जाण्याने होलार समाजाने एक आधारस्तंभ गमावला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली. तुमचे कार्य आमच्यासाठी सदैव दीपस्तंभ राहील.

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts